`स्टॅच्यू ऑफ युनिटी`ची निर्मिती करणारे शिल्पकार महाराष्ट्रात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही.
Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) भव्य पुतळा उभारला जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हा पुतळा साकारणार आहेत. राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया हा पुतळा कसा असेल.
हे दखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकोट किल्ल्यावर लवकरच 60 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणाराय. राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यावेळी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स या कंपनीद्वारे हा पुतळा तयार केला जाईल.. महत्त्वाचं म्हणजे याच राम सुतारांनी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती केलीय.
याआधी डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं.. मात्र अवघ्या 8 महिन्यात ऑगस्ट 2024 मध्ये हा पुतळा वादळात कोसळला. यानंतर पुतळ्याच्या दर्जावरुन चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. मात्र यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना सर्व खबरदारी घेतली जाणाराय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं कंत्राट प्रसिद्ध शिल्पकार राम सुतारांना देण्यात आलंय. हा पुतळा 60 फूट उंच असेल. नवीन पुतळा ब्राँझ धातूचा असले. त्यावर 8 मिमी जाडीचं क्लॅडिंग असेल. तेव्हा छत्रपतींच्या कीर्तीला साजेल असा भव्या पुतळा भविष्यात राजकोट किल्ल्यावर थाटात उभा दिसेल यात शंका नाही.