TCS Layoffs : भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारा कपात करण्यात आली. TCS कपंनीच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये एकाचवेळी 2500 IT कर्मचाऱ्यांना नोकरीवरु काढून टाकण्यात आले होते. नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी TCS कंपनीवर अनेक आरोप केले होते. या आरोपींची दखल घेत कामगार विभागाने मोठी कारवाई केली आहे. TCS कंपनीला नोटीस बजववण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये टीसीएसने त्यांच्या पुणे कार्यालयातील सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने किंवा अचानक कामावरून काढून टाकले. एनआयटीईएसचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकणे बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. पुण्यातील TCS ऑफिसमधील सुमारे 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (एनआयटीईएस) ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. एनआयटीईएसचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून त्वरित कारवाई करण्याची विनंती केली होती.
कामगार विभागाने कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीला नोटीस बजावली आहे. कामगार आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) च्या तक्रारीच्या उत्तरात ही कारवाई करण्यात आली आहे.
कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली.
जुलैमध्ये, NITES ने दावा केला होता की TCS त्यांच्या एकूण 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये पुण्यातील 2,500 कर्मचारी समाविष्ट आहेत. संस्थेने कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये TCS ने या कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि टीसीएसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये टीसीएसला कर्मचाऱ्यांच्या कपात आणि बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकण्याच्या आरोपांवर त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. टीसीएसने अद्याप या प्रकरणावर सार्वजनिक निवेदन जारी केलेले नाही.
टीसीएसने पुढील वर्षभरात त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के किंवा अंदाजे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तांत्रिक बदल आणि ऑटोमेशनच्या युगात कंपनीला अधिक कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ठेवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सागंत कंपनीने कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली. अधिक काळ एका प्रोजेक्टवर काम करणारे कर्मचारी. AI तसेच नवीन टून न शिकणारे, स्वत:ला अपडेट न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा नोटिस कालावधी देत सहा महिने ते 24 महिन्यांचे सेव्हरन्स पॅकेज देत कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.