'पक्षात हवेतले नेते आहेत,' अमोल मिटकरीचं सडेतोड मत, म्हणाले '4-5 नेत्यांवर पक्ष मोठा होत नसतो'

Amol Mitkari To The Point Interview: कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. 4 ते 5 नेत्यांच्या भरवशावर पक्ष मोठा होत नसतो असं सडेतोड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मांडलं. पक्षामध्ये असे हवेतले नेते आहेत असंही ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 28, 2026, 08:03 PM IST
'पक्षात हवेतले नेते आहेत,' अमोल मिटकरीचं सडेतोड मत, म्हणाले '4-5 नेत्यांवर पक्ष मोठा होत नसतो'

Amol Mitkari To The Point Interview: कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. 4 ते 5 नेत्यांच्या भरवशावर पक्ष मोठा होत नसतो असं सडेतोड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मांडलं आहे. पक्षामध्ये असे हवेतले नेते आहेत असं टू द पॉईंट विधानही अमोल मिटकरी यांनी केलं आहे.  झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

"कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही निर्णयप्रक्रिया होत नसते. कार्यकर्त्याच्या भरवशावरच पक्ष मोठा होत असतो. 4-5 नेत्यांच्या भरवशावर पक्ष मोठा हो नसतो," असं सांगताना अमोल मिटकरी यांनी नावं घेण्यास नकार दिला. मी जर स्वत:ला नेता समजत असेन आणि मागे कार्यकर्ताच नसेल तर तुझ्या नेत्यागिरीला काय महत्त्व आहे. अजित पवारांना मास लीडर म्हटलं जायचं. एक महिना झाल्यानंतरही लोकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही आहेत. 

'14 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होणार होती,' राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबात अमोल मिटकरींनी सांगितलं पडद्यामागील सत्य

 

पक्षात असे नेते आहेत का ज्यांच्या मागे लोक नाहीत तरी नेत्याचं स्थान आहे? असं विचारलं असता त्यांनी हवेतले नेते आहेत, तुम्ही शोधा असं म्हटलं. 

हेदेखील वाचा - 'अजितदादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्षं संसार केलाय,' राष्ट्रीय अध्यक्ष होताच सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला निर्धार

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर तुमची काय इच्छा आहे? असं विचारलं असता ते म्हणाले की, "अजित पवारांची जी इच्छा होती ती पूर्णत्वास जावी अशी माझी इच्छा आहे. अजित पवारांनी त्यांची इच्छा त्यांच्या विश्वासू लोकांना सांगितली होती. मी तितका विश्वासू नसावा. आम्ही पडद्यामागे अनेकदा अजित पवारांना विचारलं होतं. महाराष्ट्राच्या जनतेचं असं मत आहे सांगितलं होतं. त्यांनी प्रसंगानुरुप पाहू, तुम्हाला काहीतरी चांगली बातमी देऊ असं बोलायचे. असं वाटायचं की एकत्रीकरण झालं तर चांगलं वाटेल". 

'14 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होईल असं मला कळलं'

पुढे ते म्हणाले की, "फेब्रुवारीला विलिनीकरण होईल अशी चर्चा महाराष्ट्रात होती. असा सूर होता. दादा एकटेच अनेक बैठकांमध्ये होते. दादा जो निर्णय घेतील तो पक्षहिताचा आणि पक्षवाढीचा असेल हे मला माहिती होतं. 14 फेब्रुवारीला काहीतरी घडामोड होईल असं माझ्याही कानावर आलं होतं. आधी 9 फेब्रुवारी तारीख होती. पण तेव्हा सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न जुळलं होतं. त्यासंदर्भात अजित पवारच घोषणा करणार होते. 14 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होईल असं मला कळलं होतं". 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More