Maharashtra Rain : `या` राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज
मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.
Maharashtra Rain : आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Meteorological Department) मते, राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाचा अंदाज दिला आहे. आर विदर्भासह मराठवाड्याच पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. (today maharashtra rain update)
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देण्यात आले.
गणेशविसर्जनानंतर राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्यामुळे पावसाचा जोर वाढला होता. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावील होती. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद परिसरात मात्र, पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज (20 सप्टेंबर) विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
वाचा : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?
ठळक कमी दाब क्षेत्र कायम
वायव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्यकडे सरकणारी ही प्रणाली परत मागे फिरून उत्तर प्रदेशकडे जाण्याचे संकेत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस
औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं चांगली हजेरी लावली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील शिवना टाकळी प्रकल्प 100 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणाच्या पाच पैकी एक दरवाजा 10 सेमी उघडला असुन, त्याद्वारे 360 क्युसेक्सने पाणी शिवना नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवना नदी काठावरील लोकांना पुढे पुराचा धोका लक्षात घेता सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.