नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसाधारण जनता हैराण झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा सर्वसामान्यांच्या खिशावर वाईट परिणाम होतोय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज वाढत आहेत. त्यामुळे महागाईचा बोजा वाढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत पेट्रोल आज 29 पैशांनी वाढून 88.73 रुपये प्रति लीटर झालंय. हा एक नवा रेकॉर्ड आहे. मुंबईतही पेट्रोल 95.21 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आज 90.01 रुपये प्रति लिटर विकले जात आहे आणि चेन्नईमध्ये आजचा पेट्रोलचे दर प्रतिलिटर 90.96 रुपये आहे.



यावर्षी 1 जानेवारीला दिल्लीत पेट्रोलची किंमत 83.71 रुपये होती. आज ही किंमत प्रति लिटर 88.73 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे 1 जानेवारीपासून आजपर्यंत डिझेल 5.19 रुपये प्रति लिटर महागले आहे. 1 जानेवारीला दिल्लीत डिझेलची किंमत प्रति लिटर 73.87 रुपये होती आणि आज तो दर 79.06 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.


पेट्रोलनंतर डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. मुंबईत डिझेल प्रति लिटर 86.04 रुपये आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महाग दर आहे. दिल्लीत डिझेलची किंमत 79.06 रुपये, कोलकातामध्ये 82.65 रुपये प्रती लीटर आणि चेन्नईमध्ये हा दर 84.16 रुपये प्रति लीटर आहे.