सोनू भिडे, नाशिक- सततचा होणारा पाऊस आणि नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील  हरिहर गडावर विकेंड निमित्त होणारी गर्दी बघता हरिहर गड पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. १७ जुलै पर्यंत हा गड बंद राहणार आहे. या दरम्यान कोणतेही पर्यटक या ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वन विभागाकडून देण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, पुणे नंतर आता पर्यटकांची नाशिक जिल्ह्याकडे पाऊले वळली आहेत. जिल्ह्यातील पहिने, अशोका धबधबा, दुगारवाडी येथील उलटा वाहणारा धबधबा कळसुबाई शिखर, हरिहर गड अश्या अनेक निसर्गरम्य स्थळी पर्यटक भेट देत असतात. विकेंडला तर मोठी गर्दी याठिकाणी बघायला मिळते. 


काय आहे हरिहर किल्ला
हरिहर किल्ला शहाजी भोसले राजेंनी १६३६ साली निजामशाहीची पुःस्थापना करतेवेळी जिंकला होता. हरिहर किल्ल्याला हर्षगड सुद्धा म्हटले जाते. नाशिक जिल्ह्याच्या त्रंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे. हा किल्ला  प्राचीन काळात बांधण्यात आला आहे. या किल्ल्याचा वापर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला होता. आता मात्र हा किल्ला पर्यटकांसाठी खास आकर्षण बनला आहेत. 


प्रत्येक विकेंडला याठिकाणी हजारो पर्यटक हजेरी लावत असतात. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या व्हाराल होत आहेत. हा किल्ला डोंगरावर १७० मीटर उंचीवर असून एक मीटर रुंद आहे. साधारण या किल्ल्याला ११७ पायऱ्या आहेत. किल्ल्याची वाट अतिशय अरुंद आणि सरळ आहे. त्यामुळे पर्यटकांना चढण्यासाठी सुद्धा अवघड आहे. किल्ल्यावर चढून गेल्यावर गणपती आणि छोटे शिव मंदिर आहे. डग स्कॉट याने १९८६ साली सर्वप्रथम हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंग केली होती. या ट्रेकची सुरवात पायथ्याशी असलेल्या निर्गुडपाडा या गावातून होते. 


या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग घोटी चा आहे तर दुसरा मार्ग त्रंबकेश्वरचा आहे. घोटी आणि नाशिक पासून हरिहर किल्ला ४० किमी अंतरावर आहे. तर त्रंबकेश्वर पासून मोखाडा रस्त्याने गेल्यास किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या निर्गुडपाडा या गावाला जाऊन पोहचतो.   


या कारणासाठी हरिहर गड राहणार बंद
हरिहर गडावर विकेंड ला पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. पर्यटकांची मोठी गर्दी बघता अपघात होण्याची शक्यता असते. त्यात गेल्या सहा दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसाने गड चढत असताना पाय घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकरिता तीन दिवस (१७ जुलै पर्यंत) हरिहर गड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्याचा आदेश वन विभाकडून देण्यात आला आहे. मनाई आदेश असताना गडावर पर्यटक दिसून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना १७ जुलै पर्यंत हरिहर गडावर न येण्याचे आवाहन वन विभागा कडून करण्यात आले आहे.  


याही ठिकाणी बंदी
नगर जिल्ह्यातील कळसुबाई शिखर आणि नाशिक जिल्ह्यातील हरिहर गड हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण... याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी बघायल मिळेत. शनिवारी (९ जुलै) पाऊस सुरु असताना कळसुबाई शिखरावर गिर्यारोहक गेले होते. पायथ्याशी असलेल्या नदीला पूर आल्याने गिर्यारोहक अडकले होते. या नंतर कळसुबाई शिखरावर पर्यटकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे.