रत्नागिरी : landslide at Bhoste Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यावेळी खेडजवळील भोस्ते घाटात डोंगर फोडण्यासाठी सुरूंग लावण्यात आला होता. मात्र स्फोटामुळे घाटात दरड कोसळली आणि माती रस्त्यावर आली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गावर आलेला मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करायचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगण्यात आले. मुंबई-गोवा या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.



खेड जवळील भोस्ते घाटात सध्या रुंदीकरणाचे काम वेग घेत असताना आज दुपारच्या वेळेला या घाटात असणारा डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला आणि या सुरुंगामुळे डोंगर फुटून त्याची माती रस्त्यावर आली आणि त्यामुळेच हा महामार्ग ठप्प झाला. सध्या या रस्त्यावर मातीचा ढिगारा असून लवकर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे.