रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट, संपूर्ण परिसर हादरला...

प्रचंड मोठ्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 13, 2025, 09:41 PM IST
रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट, संपूर्ण परिसर हादरला...

ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरुस्तीला आलेली रुग्णवाहिकेने पेट घेतला आहे. रुग्णवाहिकेला दुरुस्ती केंद्राच्या जवळच आग लागली आहे. ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

Add Zee News as a Preferred Source

गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार–तेढा मार्गावरील मांडोदेवी वर्कशॉप येथे आज दुपारी एक भीषण अपघाताची घटना घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राची (पीएससी) ॲम्बुलन्स दुरुस्तीसाठी आणण्यात आली असता अचानक आग लागून ती काही क्षणांत जळून खाक झाली. दरम्यान, ॲम्बुलन्समध्ये ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडर स्फोट झाल्याने मोठा आवाज होत संपूर्ण मुंडीपार परिसर हादरून गेला.

मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रचंड मोठ्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,सदर ॲम्बुलन्स काही दिवसांपूर्वी बिघाड झाल्याने गोंदिया येथून टोचनद्वारे (टोचन वाहनाने बांधून) मुंडीपार येथील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये आणण्यात आली होती. गाडी वर्कशॉपच्या परिसरात उभी केल्यानंतर अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. काही क्षणातच आग पेट घेतली आणि ती वेगाने गाडीभर पसरली.

याचवेळी आत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला.स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक बाहेर पडून घटनास्थळी धावले. लगेचच मुंडीपार पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. ॲम्बुलन्स पूर्णपणे जळून खाक झाली असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, गाडीच्या विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More