Monsoon Trekking in Raigad District : ट्रेकिंग... कठिण ते अगदी सोप्या वाटा सर करत एखाद्या गडकिल्ल्याच्या किंवा सुळक्याच्या टोकाळी पोहोचण्याचा कमाल थरार. पावसाळ्याची सुरुवात होताच अनेक मंडळी ट्रेकिंगसाठी निघतात. राज्यातील बहुतांश गडकिल्ल्यांपर्यंत पोहोचतात आणि भटकंतीला वेगळ्याच दृष्टीकोनातून अनुभवतात.
ट्रेकर आणि प्रवासवेड्या अनेकांचंच प्राधान्य असणारं ठिकाण म्हणजे रायगड जिल्हा. मुंबईपासून दोन ते तीन तासांच्या अंतरावरही या जिल्ह्यातील काही गडकिल्ले स्थित असून काही गडकिल्ल्यांची नावं तर अनेकांना ठाऊकही नाहीत. चला तर मग, याच रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असणाऱ्या विविध गडकिल्ल्यांच्या नावाची यागी पाहूनच घ्या.
कर्जत - विकटगड, पदरगड, कोथळीगड, भिमगड, सोंडई, ठाक बहिरी, तुंगी, सोनगिरी
खालापूर- ईरशाळगड
सुधागड- सुधागड, भोरपगड, सरसगड, मृगगड
रोहा- सूरगड, बिरवाडी, घोसाळगड
माणगाव- विश्रामगड, मानगड, पन्हाळेदुर्ग
महाड- रायगड, पाचाड कोट, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, मंगळगड, कोकणदिवा, दासगाव
पोलादपूर- चंद्रगड, कोंढवी
श्रीवर्धन- मदगड
मुरूड- जंजिरा, कोरलई, समराजगड, पद्मदुर्ग
तळा- तळागड
अलिबाग- उंदेरी, खुबलढा, कुलाबा, सर्जेकोट, सागरगड, रेवदंडा, हिराकोट, रामदरणे, राजकोट
उरण- घारापुरी, द्रोणागिरी
पेण- सांकशी, रतनगड, मिरगड
पनवेल- प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड
पावसाच्या दिवसांमध्ये निसर्गसौंदर्याची वेगळीच छटा पाहायला मिळते. त्यातगी रायगडमधील बहुतांश ठिकाणं अशी आहेत जी आजही गर्दीपासून दूर आहेत. अशा या ठिकाणांवर पोहोचण्याची वाट बिकट असली तरीही तिथवर जाण्याची वाट मात्र तितकीच थरारक आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी हा थरार अनुभवायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील या प्रसिद्धीझोतात नसलेल्या गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.