Mumbai Pune Expressway Traffic : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमध्ये ट्रान्सपोर्टचे शेकडो ट्रकही अडकून पडले आहेत. मागील 20 ते 22 तासांपासून अनेक ट्रकचालक रस्त्यावरच ताटकळले आहेत. तहान भुकेने व्याकूळ झालेल्या या ट्रक चालकांची परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्यांनी थेट एक्सप्रेस हायवेवरच जेवण तयार केलं, मात्र पाण्याअभावी या ट्रकचालकांचे हाल सुरु आहेत.
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे ट्रान्सपोर्टचे ट्रकही अडकून पडले आहेत. गेल्या 20 ते 22 तासांपासून अनेक ट्रकचालक रस्त्यावरच ताटकळत थांबले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की चालकांनी थेट एक्सप्रेस हायवेवरच जेवणाची व्यवस्था करावी लागली आहे. काही ट्रकचालकांनी एक्सप्रेस हायवेवरच शेगडी आणि गॅस सुरू करून दुपारचा स्वयंपाक केला.
सामान्यतः मुंबईला जाण्यासाठी एवढा वेळ लागत नाही, मात्र गॅस टँकर पलटी होऊन गॅस गळती झाल्याने निर्माण झालेल्या या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिक, प्रवासी यांच्यासह ट्रान्सपोर्ट व्यवसायालाही बसला आहे. दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक लेन सुरू करण्यात आली असून यामुळे हळूहळू वाहतूक कोंडी कमी होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर काल 5 वाजताच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसचा टँकर पलटी झाला. असून गॅस गळती चालू आहे गॅस गळती थांबण्याचं काम चालू आहे एनडीआरएफ ,बीपीसीएल हेल्प फाऊंडेशन ,खोपोली पोलीस , महामार्ग पोलीस, एमएसआरडी आयआर बी, खोपोली रिलायन्स , टाटा फायर टेंडर स्पॉट वर दाखल आहेत.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
UAE
|
VS |
NEP
|
| Nepal beat United Arab Emirates by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
|
VS |
NED
|
| Zimbabwe beat Netherlands by 29 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SL-A
|
VS |
OMA
|
| Oman beat Sri Lanka A by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.