विरोधी पक्षनेत्याचा पेच, माविआत रस्सीखेच? भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा

विरोधी पक्षनेतेपदासाठी आधी भास्कर जाधवांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेद मिळावं अशी मविआची मागणी आहे. मात्र भास्कर जाधवांना शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं समजतंय. त्यामुळे आता मविआच्या मागणीला छेद देत भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे.

पूजा पवार | Updated: Dec 9, 2025, 10:58 PM IST
विरोधी पक्षनेत्याचा पेच, माविआत रस्सीखेच? भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा
(Photo Credit : Social Media)

मुंबई : राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. विरोधी पक्षनेतेपदासाठी आधी भास्कर जाधवांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेद मिळावं अशी मविआची मागणी आहे. मात्र भास्कर जाधवांना शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं समजतंय. त्यामुळे आता मविआच्या मागणीला छेद देत भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपच्या नव्या खेळीमुळे मविआमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. भाजपने विरोधीपक्ष नेतेपदावरुन कोणती गुगली टाकल्याची चर्चा आहे याविषयी जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

मंडळी अद्याप अशी अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपने या दोन्ही नेत्यांना या पदासाठीच्या सहकार्याची ऑफर दिल्याची सुत्रांची माहिती आहे. 
आता तुम्ही म्हणाल की विरोधीपक्ष नेतेपद कोणालाही दिलं काय यात भाजपचा काय फायदा कारण हे दोन्ही नेते तर भाजपवर सडकून टीका करततात. त्याचं उत्तर म्हणजे या एका गुगलीच्या माध्यमातून मविआत पडणारी फूट.

विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेतील नावं : 

१. भास्कर जाधव
२. सतेज पाटील
३. अनिल परब
४. विजय वडेट्टीवार
५. आदित्य ठाकरे 

बऱ्याच दिवसांपासून विधानसभेच्या विरोधीपक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव मुंडावळ्या बांधून तयार आहेत. ठाकरे गटाकडूनही अधिकृतपणे त्यांचच नाव पुढे करण्यात आलंय. पण मध्येच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केल्याने जाधव परत एकदा नाराज झाले. त्यात आता परबांच्या नावाचीही भर पडलीये. तर दुसरीकडे विधानपरिषदेच्या च्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव निश्चित करण्यात आलं. या दोन्ही नावांबद्दल विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींना पत्रही देण्यात आलं.

पण वडेट्टीवार आणि परबांना सहकार्याची ऑफर दिल्याची चर्चा घडवत भाजपने महायुतीतच फुट पडेल, अंतर्गत विसंवाद तयार होईल याची तजविज केलीये... त्यामुळे विरोधकांनीही याचा समाचार घेतलाय. भाजप आमच्यात फुट पाडतंय असं म्हणत या मुद्द्यावरुन फुट पडू शकते ही बाब तरी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मान्य केलीये. पदासाठी आस लाऊन बसलेल्या नेत्यांना आणखी अस्वस्थ करायचं आणि काहींना गोंजारायचं ही भाजपची रणनिती असू शकते. तर आधीच विरोधी पक्षनेतेपद तरी मिळेल अशी अपेक्षा असणाऱ्या मविआ नेत्यांना संजय गायकवडा यांनी डिवचलंय.

गायकवाड म्हणतायत त्याप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणार संख्याबळ विरोधकांकडे नाहीये.  त्यामुळे विरोधीपक्ष नेते पद द्यायचं की नाही हे सर्वस्वी सरकारच्या सहकार्यावर अवलंबून आहे. ते देण्यामागे  बऱ्याचदा पडद्यामागच्या केमिस्ट्रीचाही विचार केला जाऊ शकतो.  एक गुगली तर भाजपने टाकलीये... यावरुन आणखी काय काय घडतं हे येणाऱ्या काळात समजेलच.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More