Sanjay Raut Slams Government: नागपूरमधील हिंसाचारासंदर्भातील टीकेवरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच संतापल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर दुबईला पळाल्याच्या वृत्तावर राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. राऊत यांनी कोरटकरच्या नागपूर कनेक्शनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. त्यांनी नागपूर हिंसाचारावरुन व्यक्त केलेल्या शंकेवर साधण्यात आलेल्या निशाण्यावरही प्रत्युत्तर दिलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचं एका फोटोच्या आधारे सांगितलं जात आहे, असं म्हणत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी गृहमंत्रालयावर निशाणा साधला आहे. "प्रशांत कोरटकर हा विषय महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडे आहे. फडणवीस हे देशातील महान व्यक्ती आहेत. प्रशांत नागपूरचा, दंगल पण तिथेच होते. दंगलीबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांवर मानसिक उपचार करण्याची गरज असल्याचं काल ते म्हणाले. हा प्रश्न फक्त मी नाही तर सगळ्यांनी विचारला आहे. फडणवीस यांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार आहे. त्यावर उपचार करण्याची गरज आहे," असं संजय राऊत म्हणाले. "उद्या कोरटकर भाजप कार्यालय किंवा मंत्र्याच्या बंगल्यात सापडू शकतो," अशी शंकाही राऊतांनी बोलून दाखवली.
कोरटकर दुबईला गेला असेल तर तो गृहखात्याच्या मदतीशिवाय जाऊ शकत नाही. तो पळून गेला असेल तर नागपूर पोलीस आयुक्तांचा राजीनामा घ्यावा," अशी मागणीही संजय राऊतांनी दिली. तसेच पुढे बोलताना, "आमच्या सरकारच्या काळात कधीच दंगल घडली नाही. आमचं एकत्र सरकार असताना दंगल कधीच घडली नाही मग आता का घडते? तिला खतपाणी घालणारे लोक तुमच्या कॅबिनेटमधे बसले आहेत. सरकारमध्ये पळालेल्यावर कारवाई का करू नये? काही काळात फडणवीस यांचे सहकारी जी भाषा करत आहेत ती हे राज्याला शोभणारी नाही," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> सुरेश धस अडचणीत? 'खोक्या' प्रकरणात नार्को टेस्टबरोबरच राजीनाम्याची मागणी; 'CM फडणवीसांनी...'
कोरटकर दुबईला पळून गेल्याचा दावा केला जात असलेल्या व्हायरल फोटोमध्ये तो एका हॉटेलबाहेर उभा असल्याचं दिसत आहे. टी-शर्ट, जीन्स अन् डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये कोरकटकर आहे. हॉटेलचं नाव उर्दूत लिहिलेलं असून हॉटेलबाहेर लावल्या जाणाऱ्या झेंड्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा झेंडा दिसत आहे. तसेच कोरकटकर ज्या बसच्या बाजूला उभा आहे त्या बसच्या क्रमाकांवरुन ती दुबईमधील असल्याचं स्पष्ट होत आहे. याच फोटोवरुन कोरकटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्तामार्गे कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा आहे. मात्र या वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.