VIDEO उदयनराजेंची थरकाप उडवणारी जीप राईड... बाजूला बसलेल्या व्यक्तीचंही होतंय कौतुक

साताऱ्यात खासदार उदयनराजे यांनी काळजाचा ठोका चुकवणारी धूम स्टाईल जिप्सी राईड केली. सोशल मीडियावर त्यांचा 

Updated: Jun 21, 2021, 09:35 PM IST
VIDEO उदयनराजेंची थरकाप उडवणारी जीप राईड... बाजूला बसलेल्या व्यक्तीचंही होतंय कौतुक

सातारा :  साताऱ्यात खासदार उदयनराजे यांनी काळजाचा ठोका चुकवणारी धूम स्टाईल जिप्सी राईड केली. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या जलमंदिर या निवासस्थाहून जिप्सी चालवत असताना या व्हिडिओत दिसतायत. सायलेन्सरचा जोरदार आवाजात करत जोरात गाडी चालवताना बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. जलमंदिर ते राजवाडा या राईडदरम्यान उदयनराजेंच्या चाहत्यांनी त्यांची जिप्सी राईड कॅमेराबद्ध केली.

पण हा व्हीडिओ पाहताना एक प्रश्न नक्की पडतो, उदयनराजे हे काळजाचा ठोका चुकवणारी धूम स्टाईल जिप्सी राईड करत असताना, बाजूला बसलेली ती व्यक्ती कोण होती? त्या व्यक्तीचं धैर्यही काही कमी नाही, असंच व्हीडिओ पाहून वाटतं.