लॉकडाउनच्या केला निषेधार्थ उदयनराजेंचं ‘भीक मागो आंदोलन'

मी जर व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते - उदयनराजे भोसले  

Updated: Apr 10, 2021, 04:39 PM IST
लॉकडाउनच्या केला निषेधार्थ उदयनराजेंचं ‘भीक मागो आंदोलन' title=

सातारा : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक होत असलेली वाढ पाहाता राज्यात लॉकडाऊनच्या दिशेने हालचाली सुरू होत आहे. पण लॉकडाऊनला सर्वच स्तरातून विरोध होत असताना भाजजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयराजे भोसले यांनी देखील विरोध केला आहे. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजे भोसले यांनी ‘भीक मागो आंदोलन' केलं. यावेळी उदयनराजे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला. यावेळी उदयनराजे यांनी सचीन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली.

उदयराजे म्हणाले की, राज्य शासनात तज्ज्ञ मंडळी बसली आहे. ती मला तज्ज्ञ वाटत नाही. मी जर व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय असूच शकत नाही. नागरिक मोठ्या संकटात सापडले आहे. असं उदयराजे म्हणाले. 

सणासुदीचे दिवस आहेत. व्यापाऱ्यांनी कर्ज घेवून माल भरला आहे. व्यापाऱ्यांवर कर्जाचं डोंगर आहे. अशात लॉकडाऊन हा पर्याय नाही. उद्यापासून जर नो लॉकडाऊन संघर्ष झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असा इशारा उदयराजेंनी ठाकरे सरकारला दिला. शिवाय सरकारन लॉॉकडाऊनचा पुन्हा विचार करावा अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली.