मातोश्रीवर भेट, युतीवर चर्चा थेट? ठाकरे बंधू भेटीनंतर चर्चांना उधाण

राज्यात येत्या काही महिन्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणारय. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलीय. कारण काल पाचव्यांदा ठाकरे बंधू भेटलेत, मातोश्रीवर दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे आगामी काही दिवसात

पूजा पवार | Updated: Oct 6, 2025, 10:12 PM IST
मातोश्रीवर भेट, युतीवर चर्चा थेट? ठाकरे बंधू भेटीनंतर चर्चांना उधाण
(Photo Credit : Social Media)

Uddhav And Raj Thackeray : राज्यात येत्या काही महिन्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणारय. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलीय. कारण काल पाचव्यांदा ठाकरे बंधू भेटलेत, मातोश्रीवर दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे आगामी काही दिवसात
युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

Add Zee News as a Preferred Source

ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठींचं सत्र सुरूच आहे. मागील दोन महिन्यात ठाकरे बंधू पाचव्यांदा एकत्र आल्याचं दिसलेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय चर्चा झालीय. खुद्द संजय राऊतांनी यासंदर्भातला खुलासा केलाय. तसंच दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी युतीसंदर्भातला अंतिम टप्पा गाठल्याचं मोठं विधान संजय राऊतांनी यावेळी केलंय. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्यात पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षानं निवडणुकीसाठी कंबर कसलीय.. तसंच मुंबईमध्ये देखील मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यामुळे मुंबईत कोणाचा महापौर बसणार यावरून देखील दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. मुंबई पालिकेवर मराठीच महापौर बसणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय. तर पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय.

ठाकरेंच्या शिवसेनेचेच नव्हे तर मनसे नेते देखील युतीसंदर्भात चांगलेच सकारात्मक आहेत. बाळा नांदगावकरांनी देखील आगामी निवडणुकीत ठाकरेंचाच बोलबोला दिसणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे विरोधकांनी देखील दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर ताकद वाढणार असल्याचं मान्य केलंय.

राज ठाकरे दसरा मेळाव्याले गेले नाहीत. त्यामुळे ठाकरेंमध्ये काही बिनसलं का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, काल राज ठाकरेंनी राऊतांच्या घरून थेट मातोश्री गाठली. आणि शिवसैनिक-मनसैनिकांनी संदेश देत ठाकरे सोबतच असल्याचं दाखवून दिलं.

5 जुलै : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आक्रमक झालेत, हिंदीविरोधात वरळी डोम येथे एकत्र

27 जुलै :  उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचलेत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत चर्चा केली

27 ऑगस्ट : गणेशोत्सवात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी गपणपतीच्या दर्शनाचं निमंत्रन दिलं, त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर

10 सप्टेंबर : गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर गेलेत, तेव्हा दोन्ही बंधूंमध्ये 5 ते 10 मिनिंट राजकीय चर्चा

5 ऑक्टोबर संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाला दोन्ही राज, उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित

5 ऑक्टोबर : दरम्यान राऊतांच्या घरून ठाकरे बंधू थेट मातोश्रीवर गेलेत, मातोश्रीवर दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती

दोन ते तीन दशकांपासून मुंबई पालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. मात्र, ही सत्ता टिकवून ठेवण्याचं आवाहन आता उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे.. मात्र, पालिका निवडणुकीच्या मैदानात यावेळी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे मागील अनेक दशकांपासूनची पालिकेवरची सत्ता अबाधित ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

FAQ : 

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सध्याची स्थिती काय आहे?
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मागील दोन महिन्यांत ते पाचव्यांदा भेटले, आणि ५ ऑक्टोबरला मातोश्रीवर राजकीय चर्चा झाली. संजय राऊत यांनी युतीचा अंतिम टप्पा गाठल्याचे मोठे विधान केले असून, आगामी काही दिवसांत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

संजय राऊत यांनी युतीसंदर्भात काय म्हटले आहे?
संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीची पुष्टी करत युतीचा अंतिम टप्पा गाठल्याचे सांगितले. तसेच, मुंबई महापालिकेत मराठीच महापौर बसणार असल्याचा दावा त्यांनी केला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ठाकरेंचाच बोलबोला दिसेल, असे सकारात्मक विधान केले.

मुंबई महापालिका निवडणुकीत महापौर कोण असणार याबाबत दावे-प्रतिदावे काय आहेत?
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्याकडून मराठी महापौर बसणार आणि ठाकरेंचाच बोलबोला राहील, असा दावा आहे. दुसरीकडे, भाजप नेत्यांनी मुंबई पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. विरोधकांनीही युतीमुळे ठाकरेंची ताकद वाढेल, असे मान्य केले आहे.

About the Author