)
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यात आज चार मेळाव्यांचं सीमोल्लंघन होतंय. मुंबईत एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन असणार आहे. तर बीडमधील भगवान भक्तीगडावर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहेत दुसरीकडे नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कात ठाकरेंची तोफ धडाडणार गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा मेळावा, भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा तर नारायण गडावरून मनोज जरांगेंचा एल्गार पाहायला मिळाला. दरम्यान ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी शिवतीर्थावर एक सकारात्मक दृश्य पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा हा क्षण ठरलाय.
दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या गराड्यात अमित ठाकरे दिसून आले. अमित ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी चालत जात असताना शिवसैनिकांनी त्यांना गराडा घालत सेल्फी काढून घेतले. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क परिसरात ग्रामीण भागातून शिवसैनिक दाखल होतायत. या शिवसैनिकांच्या अमित ठाकरेंनी पाहताच त्यांना गराडा घातला.
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा सामना पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचा आवाज घुमणार आहे. आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. या महापालिका निवडणुकांचं रणशिंग या मेळाव्यातून फुंकलं जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसानं हजेरी लावलीय. या पावसामुळे शिवाजी पार्कात चिखलाचं साम्राज्य पसरलंय.. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्याच्या तयारीत अडथळे निर्माण झालेत.. त्यामुळे नियोजित पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार का याकडं सा-यांचं लक्ष लागलंय.
मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे... दोन्हीही सेनेकडून जयत तयारी करण्यात आली असून नाशिक मधून देखील शेकडो शिवसैनिक हे मुंबईला जाणार आहेत..... मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून साध्या पद्धतीने शिवसेना दसरा मेळावा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.दसरा मेळाव्याला गर्दी न करता शिवसैनिकांनी तालुकातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करावी आणि हा मेळावा साजरा करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आज साध्या पद्धतीने दसरा मेळावा साजरा करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितला आहे.
उत्तर: मुंबईत उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे होईल. याशिवाय, बीडमधील भगवान भक्तीगडावर ओबीसी नेते पंकजा मुंडे यांचा मेळावा आणि नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जारंगे यांचा मेळावा होणार आहे.
उत्तर: उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने शिवाजी पार्क परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून, तयारीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मेळावा नियोजित पद्धतीने होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तर: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दसरा मेळावा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. मंत्री दादा भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे, गर्दीऐवजी शिवसैनिकांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. नाशिकमधून शेकडो शिवसैनिक मुंबईला येणार असले तरी सोपी पद्धत अवलंबली जाईल.