)
दसरा मेळावा पार पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. मी आज पुणे पञकार संघात बसून बोलत असल्याने पञकारितेवर बोलेन पण आज खरंच पञकारितेवर अधिकार वाणीने बोलू शकू, अशा परिस्थिती खरंच आहे का? असा सवाल विचारला आहे. ठाकरे ब्रँड हा काही आज जन्माला आलेला मागच्या पाच सहा पिढ्यापासून तो सुरू आहे. विशेष म्हणजे ठाकरे ब्रँडचा जन्म हा पुण्यातूनच झालाय बर का... त्यामुळे आपला संबंध फार जुना असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचा शिवसेनेचा दसरा मेळावा अभूतपूर्व असाच झालाय लोकं पावसात उभी होती शेवट पर्यंत...आणि शिवाजी पार्कला दरवाजे नव्हते...त्यामुळे इतरांसारखं कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला पडलीच नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. शिवसैनिकांनी भर पावसात माझं भाषण ऐकलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी दसऱ्या मेळाव्याला कशी सुरुवात केली, ही आठवण सांगितली.
आताचं सरकार हे एका राजकीय पक्षाचं म्हणून तिथं काम करतंय देशाचॆ म्हणून नव्हे. तसेच उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न निर्माण केले. सोनम वांगचूकला रासुकात अटक करून दडपशाही सुरू आहे. पण माध्यम म्हणून आपण खरंच ते छापतोय का, टीव्हीवर दाखवतोय का? त्या न्यायाने मग मला सांगा तुम्हाला तरी मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी थेट पत्रकारांना केला आहे.
उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल केलेल्या विधानावर भाष्य करणं टाळलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा गद्दारांवर मी बोलणार नाही. पण होय, अशा घाणेरड्या आरोपांमुळे वेदना होतातच की पण ठिक हे आणि गद्दारांना उत्तर देत बसत नाही. असं म्हणतं त्यांनी या विषयाला महत्त्व दिलं नाही.