After Modi Who... सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे या प्रश्नाचे काय उत्तर दिले जाणून घेऊया.
)
Uddhav Thackeray Interview: देशता मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच चर्चा रंगली आहे ती देशाचा पंतप्रधान बदलण्याची चर्चा रंगली आहे. After Modi Who... असा प्रश्न उद्धव ठाकरें विचारला. कोण असेल पुढचा पंतप्रधान याबद्दल त्यांनी रोखठोक उत्तर दिले. सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
भाजपला पंतप्रधान आहे. भाजपला गृहमंत्री आहे. मात्र, देशाला पंतप्रधान नाही. देशाला गृहमंत्री नाही. पंतप्रधान बदलण्याची चर्चा आहे. भागवतजींनी 75 ची शाल घातली आहे. पण, हा बदल होतोय की नाही ते पहावे लागले. 75 वर्षानंतर निवृत्त होण्याचा शब्द मोदी पाळतील का हे तेव्हाच कळेल. कदाचीत ते निवृत्ती जाहीर करतील. मात्र, नंतर तुमचं मी मन कसं मोडणार असं ते म्हणतील. मोदी यांच्या नंतर कोण याचे उत्तर आधीच शोधून ठेवले असावे यामुळेच निवृत्तीची घोषणा करण्यात आली. आपल्याकडे लोकशाही आहे ज्या पक्षाचे बहुमत आहे त्याचा पंतप्रधान विराजमान होते.
काश्मिरमध्ये सध्या परिस्थिती पूर्ववत झाली आहे. मात्र, पहलगाम हल्ला झालाच कसा? या हल्ल्याची जबाबदारी अतिरेकी म्हणून नाही तर गलथनपणा झाला म्हणून कुणी घेतली का नाही? पर्यटक सहलीचा आनंद लुटण्यासाठी कश्मिरला गेले होते. असं काही तरी होईल अंस त्यांना वाटले देखील नव्हते. अचानक त्यांच्यावर गोळीबार. अनेकांचे कुंकू पुसले गेले. हे सर्व खूप भयानक आहे.
2 ते 3 महिने झाले अद्याप हा हल्ला करणारे दहशतवादी सापडले का नाहीत. हे सरकारचे मोठे अपयश आहे. यानंतर सराकारने सांगितले आम्ही असा हल्ला केला. आम्ही असे प्रत्युत्तर दिले. तिथे सैन्य काम करते. सैन्याच्या लढाईचे श्रेय घेण्याचे काम हे करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. पराक्रमाची शर्थ करुन सैन्य पाकिस्तानात घुसले होते. लाहोर, कराची, रावळपिंडी सर्वत्र हल्ले झाले. अचानक झाले काय? सैन्याला माघार का घ्यावी लागली या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. पाकिस्तान सातत्याने आपल्यावर हल्ले करत आहेत. कास्मिर धुमसत आहे असं असताना दुबईत जाऊन क्रिकेट मॅचचा अनंद लुटत आहे. हा काय खेळ सुरु आहे असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा प्रचार केला जात आहे. अमेरिका भारतावर दबाव आणत आहे. यासाठी व्यापाराचे कारण पुढे केले जात आहे हे सर्व खूप भयानक आहे.