)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलंय. तसंच युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधा-यांवरही निशाणा साधलाय. आम्ही एकत्र आल्यामुळे महायुतीचे धाबे दणाणल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामधील गर्दीवरूनही ठाकरेंनी शिंदेंनी डिवचलंय.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबतच्या युतीवर जाहीर भाष्य केलंय. आम्ही एकत्र आल्यामुळे सत्ताधा-यांच्या धाबे दणाणलंय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधा-यांवर शरसंधान साधलंय. मागील अनेक दिवसांपासून दोन्ही बंधू निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आहेत. मात्र, अधिकृत घोषणा कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये. मात्र, युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असून त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केलीय.
आम्ही एकत्र आल्यामुळेच सत्ताधा-यांचे धाबे दणाणले. दसरा मेळाव्यातून देखील उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात मोठं विधान केलं होतं. एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यात उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक आहेत. मात्र, राज ठाकरे अद्यापही युतीवर ठाम भूमिका घेतांना दिसत नाहीये.
ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांचंही मनोमिलन झालंय. मात्र, युतीची घोषणा कधी होणार असाच प्रश्न सध्या सर्वासमोर आहे. युतीसाठी दोन्ही बाजूंनी मनाची पूर्ण तयारी झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर युतीचा निर्णय हा राज ठाकरेच घेतील असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलंय. दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. मेळाव्यातील गर्दीवरून देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दावे-प्रतिदावे केलेत. मात्र, आज पुण्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या मेळाव्यावरून जोरदार हल्लाबोल केलाय. उदय सामंतांनी गर्दीवरून केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय.
महाराष्ट्रात आगामी निवडणुकींसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. दरम्यान या निवडणुकींमध्ये ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे युतीबाबत वारंवार विधानं करतायत. मात्र राज ठाकरेंचं काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? याकडे आता लक्ष लागलंय.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर काय विधान केलं आहे?
उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, "आम्ही एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत." ते युतीसाठी सकारात्मक आहेत आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर चर्चा करू, असं म्हणाले. हे विधान दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आलं आहे.
युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे?
मुंबई महापालिका निवडणुकीत 50-50 चा फॉर्म्युला (उद्धव ठाकरे गटाला 147 जागा, मनसेला 80 जागा) आणि उर्वरित महाराष्ट्रात 60-40 चा फॉर्म्युला असण्याची चर्चा आहे. हे फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलं आहे.
उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर कसा निशाणा साधला?
उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीचे धाबे दणाणले. एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांच्या दसरा मेळाव्याच्या गर्दीवरून त्यांनी पलटवार केला आणि सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना आव्हान दिलं.