Crime News : वहिनी पळून गेली, मूल भावाचं नाही... 13 महिन्यांच्या चिमुकलीचे 7 तुकडे करुन शेतात पुरले

Crime News : अंगावर काटा आणणारा प्रसंग धाराशिवमध्ये घडला आहे. एका 13 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा काकाने दाबून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकाराने सगळेच हादरुन गेले आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 2, 2026, 12:19 PM IST
Crime News : वहिनी पळून गेली, मूल भावाचं नाही... 13 महिन्यांच्या चिमुकलीचे 7 तुकडे करुन शेतात पुरले

अवघ्या 13 महिन्यांच्या निष्पाप मुलीची तिच्या सख्ख्या काकानेच हत्या केली आहे. हा संपूर्ण प्रकार इतका संतापजनक आहे. काकाने लहान मुलीची गळा चिरुन हत्या केली. क्रूर काका एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या शरीराचे सात तुकडे केले आणि ते शेतात पुरले. थरकाप उडवणारा हा प्रकार धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी शिवारात घडली आहे. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

गवळेवाडी येथे 13 महिन्यांची आराध्या तिच्या वडिलांसोबत राहायची. 27 फेब्रुवारी रोजी आराध्या बेपत्ता झाली. 28 रोजी आराध्याचे वडील महादेव माने यांनी तमालवाडी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केली. पोलिसांनी खबरीने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी काका शंकेश मानेसोबत दिसली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली आहे. 

(हे पण वाचा 'कवटीचा तुकडा 8 महिने...' विकास समुद्रेने सांगितली ब्रेन हॅमरेजची अवस्था, 'मी वाचलो पण माझ्याच मरणाची बातमी...') 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराध्याची आई परपुरुषासोबत पळून गेली. ही मुलगी आपल्या भावाची नाही असा संशय शंकेश मानेच्या मनात होता. 27 फेब्रुवारी रोजी त्याने पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास आराध्याला शेतात नेले. तिथे गळादाबून तिची हत्या केली. काका एवढ्यावरच थांबला नाही तर रागाच्या भरात त्याने आराध्याचे सात तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे शेतात पुरले. 

भांडूपमध्ये वर्गमित्राची हत्या

शाळेत सतत दादागिरी करतो म्हणून तीन वर्गमित्रांनी शाळकरी मुलाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना भांडुपमध्ये घडली. सिद्धार्थ लोंढे (१४), असे मृत मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिक्षण घेत होता. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सिद्धार्थ याला वडील ओरडले होते. तेव्हापासून राग मनात धरून होता. दुपारी कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर तो 3 वाजताच्या सुमारास खेळायला जातो, असे सांगून तो घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी आला नसल्याने आई-वडिलांनी परिसरात त्याचा शोध घेत त्याचे मित्र आणि नातेवाइकांकडे चौकशी
केली; पण तो सापडला नाही. सिद्धार्थच्या आईने भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा हरविल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू होता. दुसन्या दिवशी विहार लेक तलावात सिद्धार्थचा मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. परंतु राजावाडीतील शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासाची दिशा बदलली.

अन् हत्येचा उलगडा...

घटनेच्या वेळी सिद्धार्थ याचा याच परिसरातील १४ वर्षीय मित्रासोबत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या संशयित मित्राला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून चौकशी करताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. सिद्धार्थच्या मित्राने हत्येची कबुली देत अन्य दोन मित्र त्यावेळी गुन्ह्यात सोबत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मित्रांना टेंभीपाडा येथून ताब्यात घेतले. सिद्धार्थच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्याला ठार करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More