Maharashtra Politics: हे असं फक्त राजकारणातचं घडू शकतं; खासदार आणि आमदार एकाच ताटात जेवले

जालना (Jalna) येथे  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे( Minister of State for Central Railway Raosaheb Danve) यांनी आमदारासह एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. 

Updated: Jan 12, 2023, 10:38 AM IST
Maharashtra Politics: हे असं फक्त राजकारणातचं घडू शकतं; खासदार आणि आमदार एकाच ताटात जेवले title=

Maharashtra Politics:  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP President Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) पुण्यात(Pune) एकत्र दिसले. इतकचं नाही तर नेहमी एकमेकांवर टीका करणारे महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते एकमेकांचे हमसफर बनले. या दोन्ही नेत्यांनी एकत्र एकाच कार मधून प्रवास केला. यानंतर आता राजकारणात आणखी एक घडामोड घडली आहे. खासदार आणि आमदार एकाच ताटात जेवले आहे. जालना (Jalna) येथे  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे( Minister of State for Central Railway Raosaheb Danve) यांनी आमदारासह एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्यानंतर दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या रांगेत स्वतः उभं राहून स्वतः च जेवण वाढून घेतलं.

यानंतर केंद्रीय मंत्री दानवे आणि बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी एकाच ताटात जेवण केले. यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांशी गप्पा गोष्टी देखील केल्या. 

वैर विसरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र प्रवास

डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमानिमित्त पवार, फडणवीसांनी एकत्रित उपस्थिती लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. विविध विषयांवर ते एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात. 

शरद पवार देवेंद्र फडणवीस एकाच कारमधून कार्यक्रमासाठी पोहोचले. त्यांनी एकत्र कॅम्पस परिसरात फेरफटकाही मारला आणि कार्यक्रमासाठी एकाच मंचावर विराजमान झाले. याचदरम्यान विश्वजीत कदम यांनी फडणवीसांना वाकून नमस्कारही केला. राजकीय वैर विसरुन हे सगळे नेते आजच्या दिवशी एकत्र पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.