वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर, ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ!

Valmik Karads audio clip: आता  आरोपी वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आलाय.

प्रविण दाभोळकर | Updated: Jul 2, 2025, 09:17 PM IST
वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर, ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ!
वाल्मिक कराड

Valmik Karads audio clip: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झालीय.. या क्लीपमध्ये तो एका तरुणाला पैशांच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करताना पाहायला मिळतंय. या क्लीपनंतर आता वाल्मीक कराडवर वसुलीचेही आरोप करण्यात आलेत. ऑडिओ क्लिपची झी २४ तास पुष्टी करत नाही.

Add Zee News as a Preferred Source

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सध्या मकोकाखाली अटकेत आहे. आता  आरोपी वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आलाय. वाल्मिक कराडने एका तरुणाला शिवीगाळ केलीय..त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतेय. पैशांच्या वादातून कराडने तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं यातून पाहायला मिळतंय. दरम्यान झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

एका व्यक्तीने कामासाठी वाल्कीम कराडला लाखो रुपये दिले होते.  मात्र ते पैसे वाल्मीक कराड परत देत नव्हता. त्यामुळे त्या तरूणाने वारंवार वाल्मीकला वारंवार फोन केले. याचाच वाल्मीक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप विजय बांगर यांनी केलाय. याचीच ही ऑडीओ क्लीप असल्याचं विजय बांगर यांनी म्हटलंय.   

आता वाल्मिक कराड एवढ्यावरच थांबला नाही. घेतलेल्या पैशांमधील 5 लाख रुपये वाल्मिक कराडने पीडित कुटुंबाला परत दिले.. त्याचे व्हिडिओ काढले आणि पोलिसांना हाताशी धरून पीडित कुटुंबावरच खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही विजय बांगर यांनी केलाय. 

या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणाराय. वाल्मिक सध्या जेलमध्ये आहे. आता या प्रकरणातही वाल्मिकवर गुन्हा दाखल होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

याआधीही व्हायरल झाली होती ऑडीयो क्लिप 

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी आरोपींना वाल्मिकचा पाठिंबा तर सायबर पोलिसांवर दबाव टाकल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक कार्यकर्ता वाल्मिक कराडला फोन करुन पोलीस आपल्याला सतत फोन करत असल्याचं सांगतो. यानंतर वाल्मिक कराड सायबर पोलिसातील महिला अधिकारी निशिगंधा खुळे यांना फोन करुन प्रकरण मिटवण्यास सांगतो. हे बोलणं झाल्यावर वाल्मिक कराड संबंधित कार्यकर्त्याला 'फार मनावर घ्यायचं नाही, तुमचा बार इथे बसलाय' असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. 

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण आहे?

कार्यकर्ता - अण्णा नाशिकमधून बोलतोय. मला पोलीस स्टेशनमधून पुन्हा फोन येऊ लागले आहेत
वाल्मिक कराड - कोणाचा फोन आला होता, त्यांचा नंबर टाकता का
कार्यकर्ता - पीएसआय कुलथे
वाल्मिक कराड - मला नंबर द्या
वाल्मिक कराड - ताई वाल्मिक कराड बोलतोय, ती चिल्लर पोरं आहे, ती काय करणार आहे
निशिगंधा खुळे, सायबर पोलीस - पोस्ट डिलीट केली तर झालं अण्णा, आणखी काय हवं
वाल्मिक कराड - पोस्ट डिलीट करुन टाका
कार्यकर्ता - हो करतो अण्णा
निशिगंधा खुळे - वातावरण खराब होतं, सगळ्यांचेच फोन सुरु होते
वाल्मिक कराड - आम्ही शांत होतो, त्यांनीच सुरुवात केली. अरेला कारे होतं
वाल्मिक कराड कार्यकर्त्यांना उद्देशून - एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलो आहे आपण
कार्यकर्ता - तुम्ही आहात म्हणूनच दम धरला आहे

दरम्यान, वाल्मिक कराड सध्या मकोका गुन्ह्यांतर्गत एसआायटीच्या कोठडीत आहे. आजारी असल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज देत पुन्हा कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र, तो अद्यापही फरार असल्याने त्याची हत्या तर झाली नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More