Vande Bharat Express : महाराष्ट्रात सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन धावणार आहेत. या सुपरफास्ट ट्रेनमुळे नागपूरकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. नागपूरला पुणे आणि मुंबईशी जोडणारी सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन सेवा अर्थात वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Express) धावणार आहे. यामुळे नागपूर पुणे प्रवास फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. तर, नागपूर मुंबई प्रवासाचे 6 तास वाचणार आहेत.
दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी नागपूर रेल्वे विभागाकडून केंद्रीय बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्राला लवकरच दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहे. नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या ट्रेन सुरु झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवासही होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे नागपूर ते पुणे हे अंतर फक्त तीन तासांवर येणार आहे. सध्या नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गरीबरथ एक्सप्रेस धावतात. या एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळा तर हमसफर एक्सप्रेस आठवड्यातून एकदाच धावते. नागपूर-पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेची संख्या खूपच मर्यादित आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे नागपूर ते पुणे असा दहा तासांचा प्रवास फक्त तीन तासांत होणार आहे.
नागपूर ते मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा प्रवास देखील अती जलद होणार आहे. सध्या नागपूर ते मुंबई रेल्वे प्रवासासाठी सुमारे 16 तास लागतात, तर सुपरफास्ट एक्सप्रेसने 12 ते 13 तासांत हा प्रवास पूर्ण होतो. दुरांतो एक्सप्रेस ही या मार्गावरील सर्वात जलद एक्सप्रेस आहे. दुरांतो एक्सप्रेस 12 तासांच्या नागपूरला पोहचते. मात्र, वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यास नागपूर-मुंबई प्रवास 10 तासांत पूर्ण होणार आहे. प्रवाशांचे तब्बल 6 तास वाचणार आहेत.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.