महाराष्ट्रातील दुसरा मोठा सी लिंक; दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण होणार
Swatrantya Veer Savarkar Setu : महाराष्ट्रात आणखी एक सी लिंक तयार होत आहे. यामुळे मुबंईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास फक्त 45 मिनिटातं पूर्ण होणार आहे.
Versova–Bandra Sea Link, Swatrantya Veer Savarkar Setu : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक हा महाराष्ट्रातील पहिला सी लिंक आहे. आता महाराष्ट्रात वांद्रे ते वर्सोवादरम्यान दुसरा मोठा सी लिंक उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे. जाणून घेऊया प्रकल्प कसा असेल? हा प्रकल्प कधी पूर्ण होईल.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील एकमेव महामार्ग ज्याचे काम तब्बल 12 वर्षापासून रखडलयं
वांद्रे वर्सोवा सी लिंक हा स्वातंत्र्य वीर सावरकर सेतू नावाने ओळखला जातोय. या प्रकल्पाचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे 2028 पर्यंत हा प्रक्लप पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. हा सी लिंक तयार झाल्यावर वांद्रे ते वर्सोवा हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. तर, भविष्यात हा सी लिंक वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते दहिसर हा दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू हा मुंबईतील दुसरा सागरी सेतू आहे.
वांद्रे वर्सोवा सी लिंकमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वर्सोवा येथे सुरू होणार हा सी लिंक कार्टर रोड जुहू मार्गे वांद्रापर्यंत पोहोचणार आहे. हा सी लिंक वांद्रे ते वरळी सी-लिंकला जोडला जाणार आहे. हे संपूर्ण अंतर सुमारे 17.17 किलोमीटर इतके आहे.
वांद्रे वर्सोवा सी लिंक हा वांद्रे वरळी सी-लिंकपेक्षा वेगळा असणार आहे. वांद्रे ते वरळी सी-लिंक दरम्यान मध्येच कुठेही बाहेर पडण्याचा मार्ग नाही. मात्र, वांद्रे वर्सोवा सी लिंकवर ऑटर क्लब, जुहू लिंक रोड आणि नाना नानी पार्क या ठिकाणी जोडमार्ग असणार आहेत. यामुळे येथून प्रवाशांना सी लिंकवरुन प्रवास करता येणार आहे.
मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी-लिंक जोडला जाणार आहे. यानंतर वांद्रे-वरळी सी-लिंक वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. कोस्टल रोड आणि दोन सी लिंक एकमेकांना जोडल्यानंतर भविष्यात मरीन ड्राइव्ह ते दहिसर हा दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.