व्हिडिओ : आज्जी दाखवून देतायत, शिक्षणाला वय नसतं...

फळविक्रीचा व्यवसाय असल्याने आणि त्यासाठी येणं जाणं सोयीचं व्हावं यासाठी आजीबाई गाडी शिकल्या आहेत

Updated: May 8, 2018, 10:40 PM IST

कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड : शिक्षणाला वय नसतं हे  पिंपरी चिंचवडमधल्या आजीबाईंनी दाखवून दिलंय. सत्तरी नंतर आजी दुचाकी शिकल्या आता त्या पोहायला शिकणार आहेत. नऊवारी साडी... काष्टा घातलेल्या या आहेत शशिकला ढवळे... वय 70 च्या पुढं... पिंपरी चिंचवडमध्ये टेल्को रोडवर त्यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. पण काष्टा घातलेल्या नऊवारीमध्ये आजीबाई दुचाकी चालवताना दिसल्या की अनेक जण तोंडात बोटं घालतात... 

वयाच्या सत्तरीनंतर आजी दुचाकी शिकल्या... फळविक्रीचा व्यवसाय असल्याने आणि त्यासाठी येणं जाणं सोयीचं व्हावं यासाठी आजीबाई गाडी शिकल्या आहेत. एवढ्यावर त्या थांबणार नाहीत, आता त्या पोहायलाही शिकणार आहेत.  

गाडी चालवणे, पोहणे यात तसे काही नाविन्य नाही पण ते वयाच्या 70 व्या वर्षी शिकणे खरंच कौतुकास्पद आहे, हे मात्र नक्की.