)
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : (Vidhan Parishad Election) विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धर्तीवर अनेक घडामोडी घडत असून, उमेदवारी आणि अर्ज मागे घेण्याच्या सत्रामध्ये अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळत आहेत. त्यातच विदर्भातून एक नाव सातत्यानं केंद्रस्थानी असून, आपला अर्ज बाद करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्यानं या नेत्यांनी लक्ष वेधलं आहे.
अमरावती विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चर्चेत असणारी नावं म्हणजे बाजोरिया पिता पुत्रांची. या पिता पुत्रांना मोठा धक्का बसला असून महायुतीचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. विप्लव बाजोरिया कोर्टात धाव घेणार असल्यामुळं कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
अर्ज बाद झाल्यानंतर बिजोरिया पिता- पुत्रांविरोधात लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला. अर्ज बाद झाल्यानंतर विप्लव बिजोरिया आणि गोपीकिशन बिजोरिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खडाजंगी पाहायला मिळाली.
'सर्वांनी मिळून माझा अर्ज बाद करण्यासाठी केलं कटकारस्थान केलं' म्हणत अधिकाऱ्यांवर यासाठी दबाव होता, असा संताप व्यक्त करत हायकोर्टाने मध्ये जाऊन न्याय मागेन असं विप्लव बाजोरिया म्हणाले होते. अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर घेतला काँग्रेसने आक्षेप घेतला होता. बाजोरिया यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तब्बल तीन तास दोन्ही पक्षांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे युक्तिवाद केला. विप्लव बाजोरिया यांनी बंडखोरी करत भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांना आव्हान दिलं होतं.
दरम्यान, महायुतीचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांना अखेर न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाली. विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने रद्द केला होता.
बाजोरिया यांच्या वकिलांनी सर्व चारही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागितले असून आता चारही उमेदवारांचे अर्ज पुन्हा तपासले जाण्याची शक्यता आहे. नागपूर हायकोर्टात आजच विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर सुनावणी होणार आहे. विहीत नमुन्यामध्ये माहितीचा उल्लेख न करता वेगळ्या पद्धतीने माहिती लिहल्याचा आक्षेप घेत उमेदवारी अर्ज केला होता रद्द. प्रतिज्ञापत्रामधील नवीन नमुना 26 म्हणजेच मालमत्तेची माहिती विहित नमुन्यामधील प्रतिज्ञा पत्राद्वारे सादर करणे बंधनकारक होते मात्र ते नमुन्यामध्ये नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता.