Reel Vs Real lavhalwadi village : 'हिडन जेम' (Hidden Gem) अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य गोष्टी व्हायरल होतात. खाण्यापिण्याच्या, खरेदीच्या ठिकाणांसह असंख्य पर्यटनस्थळांचाही त्यामध्ये समावेश असतो. अशा या व्हायररल होणाऱ्या रील आणि फोटोपोस्टमध्ये मागील काही दिवसांपासून (Maharashtra Tourism) महाराष्ट्रातील एक छोटंसं गाव बरंच चर्चेच आलं. खऱ्या अर्थानं डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या गावातून जाणारी वाट, या वाटेच्या दोन्ही बाजूंना असणारी शेततळी, तिथली हिरवळ आणि या गावाचा साधेपणा प्रत्येकाचच मन जिंकत आहे. इतकच काय, तर या गावाची पोस्ट किंवा रील (Insta Reel) पाहिल्यानंतर पुढच्याच क्षणी ते नेमकं कुठंय, याचा शोधही बरेच नेटकरी घेत आहेत.
ते म्हणतात ना, काही गोष्टी व्हायरल न झालेल्याच बऱ्या असतात; त्याचा प्रत्यय सध्या या गावात येत आहे. निसर्गाच्या अगाध लीलांनी नटलेल्या या गावाचं नाव आहे लव्हाळवाडी. भंदारदरा इथं वसलेलं हे गाव अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवत असलं तरीही सध्या ते इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे की, अनेक लहानमोठे फिरस्त्यांचे गट, कोणी सोलो ट्रॅव्हरलर, इंफ्लुएन्सर या गावाला भेट देत आहेत. या गावाच्या व्हायरल झालेल्या रस्त्यावर गावकरी कमी आणि भटकंतीसाठी आलेल्यांची आणि रील बनवणाऱ्यांचीच तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर वेळप्रसंगी इथल्या छानशा वाटेवर वाहतूकोंडीसुद्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळं गावचं सौंदर्य जपण्यासाठी आवाहन करणाऱ्या आणि शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांनीच या गावात सुरू असणारं हे 'रील प्रकरण' थांबवण्याचं आवाहनही केलं आहे.
लव्हाळवाडी गावावर महाराष्ट्र पर्यटन विभागाचं लक्ष गेलं नाही, अशीही बाब नाही, कारण वर्षभरापूर्वीच या विभागानं सोशल मीडिाच्या माध्यमातून हे ठिकाण सर्वांसमोर आणलं होतं. जिथं ते नेमकं कुठे आहे याचीही माहिती देण्याक आली होती. अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडं असल्याचं त्या पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं.
तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात निसर्गाचा मोठा ठेवा आहे. मोसमात येथील करवंदाच्या जाळ्या, गावठी आंब्याची झाडे, तसेच इतर फळझाडे आणि काही वेली बहरत असून, . भंडारदरा बॅकवॉटरच्या शेवटी असलेल्या या लव्हाळवाडी गावाजवळील पूलावरुन प्रवास करताना येथील निसर्गाच्या विहंगम सौंदर्याने पर्यटक मंत्रमुग्ध होतात, असं म्हणत या गावाकडे सर्वांचच लक्ष वेधलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत या गावानं बरेच रीलस्टार आणि तऱ्हेवाईक पर्यटकही पाहिले असतील असं म्हणणं गैर नाही.
लव्हाळवाडी गाव कशामुळे व्हायरल झाले आहे?
लव्हाळवाडी गाव 'हिडन जेम' म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम रील्स आणि फोटो पोस्टमध्ये गावातील डोंगररांगांतील वाट, शेततळी, हिरवळ आणि साधेपणा दाखवला जात आहे.
गावाची नेमकी जागा कुठे आहे?
लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे अकोले तालुक्यात, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले हे गाव आहे. गावाजवळील पूलावरून प्रवास करताना निसर्गाचे विहंगम सौंदर्य दिसते.
व्हायरल रील्सचा गावावर कसा परिणाम होत आहे?
व्हायरल झाल्याने गावात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. फिरस्ते, सोलो ट्रॅव्हलर्स आणि इंफ्लुएन्सर्स रील बनवण्यासाठी येत आहेत. गावाच्या वाटेवर गावकरी कमी आणि पर्यटक जास्त दिसतात.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.