पंढरपूर : पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात महिनाभर पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. पंढरपूर शहराला एकदिवसाड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर नगरपालिकेने घेतलाय. पंढरपूर शहराला भीमा नदीवरील बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो. सध्या या बंधाऱ्यात  दीड मीटर म्हणजे १४ एमसीएफटी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणी साठा जास्तीत जास्त महिनाभर पुरू शकणार आहे. उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास अद्याप दोन महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे एक दिवसाड पाणीपुरवठा करण्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नसल्याने पंढरपूर शहरावर आताच जलसंकट आले आहे.


पाणी पातळी खाली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या बंधार्यातून पंढरपूर शहराला पाणीपुरवठा होतो त्यामधून सांगोला शहर, शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना, कासेगाव पाणीपुरवठा योजना आणि रेल्वे साठी सुध्दा पाणी वापरले जाते.


याबंधार्यातून शेतीसाठीही शेतीपंपाद्वारे पाणी उपसा सुरू असल्याने पाणी पातळी झपाट्याने खाली जात आहे.


तीन दिवसाड आड पाणी ?


उजनी धरणाच्या पाणी सोडण्याच्या नियोजनानुसार जानेवारी अखेर भीमा नदीत पाणी सोडले जाईल. ते पाणी पंढरपूरात येण्यासाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागतो.


त्यामुळे बंधार्यातील पाणी जानेवारी अखेर पर्यंत पुरवण्याचे प्रशासनापुढे आव्हान असाणर आहे.


जर डिसेंबर अखेर पाणी सुटले नाही तर पंढरपूरला तीन दिवसाड आड पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते.


यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकदिवसाड पाणी पुरवठा केला होता.


आता पुन्हा दोन महिन्यातच पंढरपूर सह सांगोला आणि इतर पाणी पुरवठा योजनावर जलसंकट आले आहे.