पाणी जपून वापरा! महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट, मार्च संपायच्या आधीच जलसाठा अर्ध्यावर

Maharashtra Dam Water Level Today: महाराष्ट्रातील धरणांमधील साठा अर्ध्यावर आला आहे. कशी आहे स्थिती जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 16, 2025, 12:00 PM IST
पाणी जपून वापरा! महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट, मार्च संपायच्या आधीच जलसाठा अर्ध्यावर
Water level decreases in lakes and dams that supply to maharashtra

Maharashtra Dam Water Level Today: उन्हाळ्याची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांतील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच राज्यातल्या सुमारे तीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा 52 टक्क्यांवर आला आहे. 

पुढील काही दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याची मागणी वाढली असून धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. पावसाळ्यास अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर नागरिकांना राहावे लागणार आहे. धरणातील पाणीसाठा खूप कमी झाल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो.  दरम्यान राज्याच्या धरणांमध्ये सध्या किती जलसाठा आहे पाहू या.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात किती पाणीसाठा

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत एकूण ४२ टक्के म्हणजेच ६ लाख १६ हजार ५५४ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर धरणाची पाणीसाठवण क्षमता १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर आहे. आता यामध्ये २२ टक्के म्हणजेच २९ हजार २०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. तानसा धरणाची साठवण क्षमता १ लाख ४४ हजार ८० प दशलक्ष लिटर आहे. यामध्ये सध्या ५० हजार ६२९ दशलक्ष लिटर म्हणजेच ३४ टक्के 

राज्यातील धरणांचा १५ मार्चपर्यंत पाणीसाठा

कोयना
६३.६४ टक्के
तिलारी
४४.२३ टक्के
गंगापूर
७१.४२ टक्के
जायकवाडी
६२.१७ टक्के
राधानगरी
६५.०७ टक्के
पानशेत
५५.०८ टक्के
खडकवासला
७०.०१ टक्के

विभागातील पाणीसाठा

नागपूर
४८.८३ टक्के

अमरावती
५७.३९ टक्के

नाशिक 
५२.८९ टक्के

पुणे
५२.२२ टक्के

कोकण
५७.६३ टक्के

छत्रपती संभाजीनगर 

५१.११ टक्के