मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत गाठा नवी मुंबई विमानतळ; आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त प्लान

मुंबईतून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. यासाठी वाहतुकीच्या जबरदस्त पर्याय सुचवण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 21, 2025, 09:53 PM IST
मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत गाठा नवी मुंबई विमानतळ; आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त प्लान

Water Taxi Services: नवी मुंबई विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport - NMIA) उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. एप्रिल 2025 अखेरीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या विमानसेवा सुरु होणार आहे. मार्च 2025 अखेरीस देशांतर्गत वाहतूक सुरु होणार तर एप्रिला 2025 अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमातळापर्यंत पोहचण्यासाठी रेल्वे, भुयारी मेट्रो, अटल सेतू, एक्स्प्रेस वे यासारखे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मात्र, यापेक्षा जबरदस्त प्लान तयार केला जाणार आहे. या प्लाननुसार मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील एकमेव विमानतळ आहे. या विमातळावर वाहतुकीचा मोठा ताण येत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईच्या विमानतलावरीव ताण कमी होणार आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे (Navi Mumbai International Airport - NMIA)  भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. 

प्रवाशांना जलद गतीने नवी मुंबई विमानतळावर पोहचता यावे यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय निर्माण केले जात आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनी वॉटर टॅक्सीचा प्रस्ताव मांडला आहे. वॉटर टॅक्सीच्या माध्यमातुन  मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येईल असे गडकरी म्हणाले. 

हे देखील वाचा... भारतातील सर्वात मोठा बस डेपो, याच्यासमोर एअरपोर्टही छोटा वाटेल; 3000 वाहनांसाठी पार्किंग, 3 हॉटेल, शॉपिंग मॉल आणि बरंच काही...

मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सरकारने वॉटर टॅक्सीची योजना तयार केली आहे. या योजनेअंतगर्त नवी मुंबई विमानतळाजवळ नेरुळ, बेलापूर तसेच उरण परिसरात जेट्टी बांधण्यात आला आहे. मुंबईतून वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून अगदी जलद गतीने नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More