हिंदूविरोधी असल्याच्या आरोपांवर काय म्हणाले निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई? काय बोलायला नको होतं असं म्हणाले?

 झी 24 तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांनी अनेक प्रश्नांवर आपली थेट भूमिका मांडली.

पूजा पवार | Updated: Dec 13, 2025, 10:09 PM IST
हिंदूविरोधी असल्याच्या आरोपांवर काय म्हणाले निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई? काय बोलायला नको होतं असं म्हणाले?
(Photo Credit : Social Media)

To The Point With Kamlesh Sutar : झी 24 तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांनी अनेक प्रश्नांवर आपली थेट भूमिका मांडली. सरन्यायाधीक्ष असताना भूषण गवई हे मध्य प्रदेशातील खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धारासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने  चर्चेत आले होते.  याचिकाकर्त्याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं होतं की, 'देवताला स्वतःला काही तरी करण्यास सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. मग आता जाऊन प्रार्थना करा. हे पुरातत्व स्थळ आहे आणि ASI ची परवानगी आवश्यक आहे'. यानंतर गवई हे हिंदू विरोधी असल्याचे आरोप त्यांच्यावर होऊ लागले. दरम्यान एका वकिलाने भूषण गवईंवर बूट भिरकावत 'सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदुस्तान' अशा घोषणा केल्या होत्या. हिंदूविरोधी असल्याच्या आरोपां संदर्भात निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. 

Add Zee News as a Preferred Source

हिंदूविरोधी असल्याच्या आरोपांबाबत काय म्हणाले?

मी वडिलांसोबत लहानाचा मोठा झालो. वडील सर्वधर्म समभाव खऱ्या अर्थाने पळायचे. कुठे वडिलांच्या मित्रांनी म्हटलं की चर्चमध्ये चला तर तिथे जायचे, दर्ग्यामध्ये, मंदिरांमध्ये सुद्धा जायचे. त्यामुळे प्रत्येक धर्माबाबत आम्ही नेहमीच आदर ठेवलाय. कुठल्याही धर्माचा अनादर करण्याचं काहीच कारण नाही. विषय असा होता की खजुराहोची मंदिर आहेत ती सर्व एसएआयच्या ताब्यात आहेत. आणि जिथे ही मंदिर एसएआयच्या ताब्यात असतात तिथे त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही तिथे हात सुद्धा लावू शकत नाही. एवढंच तर यापूर्वी सुद्धा मुस्लिम समाजाशी संबंधित कशी विषयांवर मी बोललो होतो त्यावेळी सुद्धा मी मुस्लिम विरोधी असल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी आमचं हेच म्हणणं होतं की एसएआयमध्ये ज्या ज्या साईट्स येतात त्याचं प्रोटेक्शन, कन्झर्वेशन आणि प्रिझर्व्हेशन झालं पाहिजे.त्यावेळी हे सगळं करत असताना ज्या धार्मिक प्रथा आहेत त्यांना कोणी रोखू शकत नाही'. 

मध्य प्रदेशातील खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धारासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांनी याचिकाकर्त्याला "देवाला जाऊन सांगा" असे म्हटले होते. ज्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. तेव्हा या वक्तव्यावर भूषण गवई यांनी मी असं बोलायला नको होतं असं म्हटले. 

गवई म्हणाले की, 'प्रत्येक गोष्ट बोलताना तुम्ही विचार करून बोलत नाही, बऱ्याचदा अशा काही गोष्टी बोलल्या जातात. जे काय बोलतोय ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय याचा विचार केला पाहिजे. मी तेव्हा जे काय बोललो होतो ते नाही बोलायला पाहिजे होतं. चुका या प्रत्येकाकडून होतच असतात'. हे वक्तव्य करून चूक झाली का? असं विचारल्यावर गवई म्हणाले की, 'कोर्टात असताना प्रत्येक गोष्ट तोलून मापून बोलणं आवश्यक असतं. कारण तुमचं बोलणं हे अनेकदा कोणत्या दृष्टिकोनातून घेतलं जातंय हे तुमच्या हातात नसतं. त्यामुळे त्या घटनेनंतर मी स्वतः काळजी घेतली की अशा प्रकारचं वक्तव्य चुकूनही माझ्या माझ्याकडून बोललं जाऊ नये'. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More