सव्वा वर्षानंतरही मारेकरी मोकाट, महादेव मुंडेंचा खून कुणी केला?

Mahadev Munde Murder Case: परळीच्या महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात तपास करणारे पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 24, 2025, 08:42 PM IST
सव्वा वर्षानंतरही मारेकरी मोकाट, महादेव मुंडेंचा खून कुणी केला?
महादेव मुंडे हत्या

Mahadev Munde Murder Case: महादेव मुंडे हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनीच महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास दडपल्याचा आरोप केलाय. ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली त्या दिवशी काही पोलिस अधिकाऱ्यांना तब्बल दीडशे फोन केल्याचा दावा धस यांनी केलाय. महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांनीही या हत्येचा तपासही सीआयडीकडं देण्याची मागणी केलीय.

Add Zee News as a Preferred Source

परळीच्या महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात तपास करणारे पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास गेल्या सव्वा वर्षांत का झाला नाही असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडे यांचा खून झाला त्या काळात  वाल्मीक कराड याची मुलं श्री आणि सुशील कराड यांनी पोलीस अधिकारी रवींद्र सानप याच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतत तब्बल दीडशे वेळा फोन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.

काही पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासल्यावर महादेव मुंडेंचा खून कुणी केला हे आपोआप समोर येईल असा दावा सुरेश धस यांनी केलाय.

सुरेश धस यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन महादेव मुंडेंच्या हत्येच्या फाईलवरील धुळ झटकून तपास करण्याची मागणी केलीय. सुरेश धस यांनी मागणी केल्यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेही पुढं आल्यात. त्यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीनं करावा अशी मागणी केलीय.

परळीतल्या सरकारी कार्यालयांसमोर महादेव मुंडेंची हत्या होते. पोलीस महादेव मुंड़ेंच्या हत्येची फाईल दाबून टाकतात. दीड वर्ष कोणताही तपास होत नाही. महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना ज्यांच्यावर संशय आहे ते पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. ही परिस्थिती बीडचा बिहार झालाय हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. आता तरी महादेव मुंडेंचे मारेकरी पोलीस पकडणार का हे पाहावं लागणार आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More