Namdev Shastri Exclusive Interview: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरण वाल्मिक कराडसह इतर आरोपींची चौकशी सुरु आहे. वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याने याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरदेखील आरोप होत आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान भगवान गडाचे महंत शास्त्री नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठींबा जाहीर केलाय. दरम्यान काही वर्षांपुर्वी पंकजा मुंडे या राजकीयदृष्ट्या अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी नामदेव शास्त्री उभे का राहीले नाहीत? असा प्रश्न विचारला जातो. यावर झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत त्यांनी उत्तर दिले आहे.
त्या माझ्याकडे आल्याच नाही. 53 दिवसानंतर धनंजय मुंडे माझ्याकडे आले. म्हणून मी त्यांना पाठींबा दिला, असे नामदेव शास्त्रींनी झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत बोलताना सांगितले.
वाल्मिक कराड तुमच्याकडे आला तर पाठींबा द्याल का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना, तो नेता नाही. नेता आपल्या घरापासून मैलान मैल लांब असतो. राजकारण्यांना मी सामान्य मानत नाही. जग झोपलेलं असतं तेव्हा हे जागे असतात, असे उत्तर त्यांनी दिले.
आमच्याकडे कोणत्याही स्तरातील लोकांनी यावं आणि शुद्ध होण्याचे आशीर्वाद घेऊन जावे. जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी राहील, असे नामदेव शास्त्री म्हणाले.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हायला हवी. ते न्यायालयाचे काम आहे. हत्येचे समर्थन मी करत नाही. धनंजय मुंडे यांचे समर्थन करतोय हे माझी व्यक्तिगत आणि भगवान गडाची भूमिका आहे. भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. हे दोन्ही विषय वेगळे आहे. मला वाटत धनजंय मुंडे निर्दोष आहेत, म्हणून मी त्यांची पाठराखण करतोय. आरोपी पकडले आहेत. त्यांची चौकशी होईल आणि निकाल लागेल. हे कोणी थांबवू शकत नाही. धनंजयचे राजकीय व्यक्तीमत्व आहे. त्याच्या आजुबाजूला अनेकजण असतात. त्यामुळे धनंजय मुंडेना दोषी ठरवता येणार नाही, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या मागे धर्मसत्तेची ताकद उभी केली जातेय. यामुळे तुम्हालाही समर्थन मिळत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मुंडेंचे सामाजिक कार्य मी पाहीले आहे. विवाहाने संसार उभे करताना आम्ही पाहिल्याचे ते म्हणाले.
हा मुद्दा राजकीय आहे. तुम्ही या राजकारणाचा भाग बनताय असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, 'भगवान गडावर राजकारण होणार नाही. पाठींबा देणं म्हणजे राजकारण नाही. भगवान गड सामाजिक, अध्यात्मिक आहे. एका व्यक्तीला मी सहकार्य करतोय. चांगल्या मतांनी निवडून आलेल्या नेत्याला मी समर्थन करतोय. सामान्य लोकांना काही समजत नाही म्हणून ज्ञानेश्वरी समजून सांगावी लागते. एका भक्ताच्या पाठीमागे गड उभं राहणं याला तुम्ही राजकीय मुद्दा म्हणताय,' असे महंत शास्त्री म्हणाले.
माझ्या पाठींब्याने न्यायव्यवस्थेच्या निर्णयावर परिणाम होणार नाही. भगवान गडाला वाटतं त्यांना पाठींबा द्यावा. वाल्मिक कराड हा पोलीस यंत्रणेचा भाग आहे. धनंजय मुंडेंचं खासगी आयुष्य हे त्यांचं आहे. मला इतर कशाबद्दलही बोलायच नाही. मी सगळ्यांना ओळखतो. संत असंत गडावर सर्वच येतात. धनंजयला माझा पाठींबा आहे, यावर महाराष्ट्राने राजकारण करु नये. हत्येच्या आरोपींना फाशी व्हावी. धनंजय दोषी ठरत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यासोबत आहोत, असे नामदेव शास्त्री म्हणाले.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More
LIVE|
BRN
131/7(19 ov)
|
VS |
MAS
61/0(8 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
LES
(19.3 ov) 60
|
VS |
BOT
61/4(11 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.