`सुषमा स्वराज यांनी चीनला खडसावलं का नाही?`
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र परीषदेत चीनला का खडसावल नाही.
नांदेड : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र परीषदेत चीनला का खडसावल नाही. कुलभूषण जाधव यांचा प्रश्न का मांडला नाही असा सवाल एम.आय.एमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांनी मांडलाय.
नांदेड महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. रोहिंग्या मुस्लिम प्रश्नावर काँग्रेस गप्प का असा सवालही त्यानी उपस्थित केलाय. या विषयावर काँगेसने आपली भूमिका जाहीर करावी असं ओवेसी म्हणाले.
सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावलं
आम्ही वैज्ञानिक तयार केले. मात्र, पाकिस्तानने अतिरेकी आणि जिहाद्दी तयार करण्याचे काम केले. जर हाच पैसा गरिबांसाठी वापरला असता तर तुमची गरिबी दूर होण्यास मदत झाली असती, असे संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत शांतीचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच दोन्ही देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु, पाकिस्तानने काय तयार केले? पाकिस्तानने दहशतवादी संघटना तयार केल्या. निरपराध माणसांचे रक्त सांडवणारा पाकिस्तान आम्हाला मानवी हक्क काय असतात हे सांगत आहे, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानला खेडबोल सुनावलेत.
जेव्हा ते बोलत होते, तेव्हा ऐकणारे, 'लूक हू इज टॉकिंग', असे म्हणत होते, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानची खिल्लीही उडवली. पाकिस्तानकडून दहशतवादाचा निषेध करणे हा केवळ दिखाऊपणा आहे. दहशतवाद नेमका ओळखून त्याच्याविरोधात लढणे अत्यंत गरजेचे आहे याकडेही त्यांनी उपस्थित जगभरातील प्रतिनिधींचे लक्ष वेधले.