Maharashtra Shops And Establishments Act Shops Can Work 24 Hours : महाराष्ट्रातील दुकाने आता 24 तास सुरु राहणार आहेत. कामगार विभागाने यासंदर्भात एक सरकारी आदेश जारी केला आहे. याअंतर्गत, दुकाने 24 तास उघडी खुली राहणार आहेत. परंतु अट अशी आहे की त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 24 तासांची सुट्टी द्यावी लागेल. महाराष्ट्र सराकारने दुकाने 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय का घेतला आहे जाणून घेऊया.
कामगार विभागाच्या एका अधिकाऱ्याने या निर्णयाबाबत माहिती दिली. दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दुकानदारांकडून अनेक वर्षांपसासून करण्यात येत होती. अकेर ही मागणी मान्य जाली आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरात 24 तास व्यवहार सुरु राहणार आहेत. सर्व दुकांना 24 तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी यामध्ये बार आणि वाईन शॉपचा समावेश नाही. त्यांना पूर्वीसारखेच नियम लागू आहेत.
2017 मध्ये, सरकारने परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर आणि दारू देणारी इतर ठिकाणे तसेच थिएटरचा समावेश केला. तथापि, 2020 मध्ये, सरकारने थिएटरना यादीतून काढून टाकले. इतर ठिकाणी नियम लागू आहेत, परंतु ते 24 तास दुकानांच्या सूटमध्ये समाविष्ट होणार नाहीत. मुंबई शहरात अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त दुकाने आहेत. नाईटलाइफची मागणी बऱ्याच काळापासून वाढत आहे. आतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याबाबत स्पष्टता नव्हती. अनेक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. परवानग्यांबाबत स्पष्टता नसल्याने, पोलिस रात्री दुकाने बंद करत असत, ज्याला अनेकदा निदर्शनेही करावी लागत असत.
सरकारने का घेतला मोठा निर्णय?
राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 24 तास दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने, भारत आणि परदेशातील पर्यटक 24 तास शहरात येतात. रात्रीच्या वेळी बाजारपेठा बंद असल्याने लोक अनेकदा गैरसोयीच्या तक्रारी करत असत.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र शाह यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की यामुळे व्यवसायाला चालना मिळेल आणि सामान्य माणसाला फायदा होईल. तथापि, सरकारने कोणत्याही अटी लादल्या जाणार नाहीत याची खात्री करणे महत्वाचे आहे. व्यवसायांनी दुकानातील कामगारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची देखील खात्री करावी.
कामगारांचे हित लक्षात घेण्यासह सुरक्षेच्या अनुषंगाने देखील सरकारने खबरदारी घेतली आहे. रात्रभर दुकाने सुरु राहणार असल्याने सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांना खबरादारी घेण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. यामुळे मुंबई पुमे सारख्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्तात वाढ होणार आहे.
FAQ
1 महाराष्ट्रातील दुकाने आता २४ तास सुरू राहणार आहेत का?
होय, कामगार विभागाने जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार, महाराष्ट्रातील दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये २४ तास व्यवहार सुरू राहणार आहेत.
2 या निर्णयाची अट काय आहे?
दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून २४ तासांची सुट्टी द्यावी लागेल. हे कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहे.
3 हा निर्णय का घेतला गेला?
उत्तर: दुकानदारांकडून अनेक वर्षांपासून जास्त वेळ दुकाने उघडी ठेवण्याची मागणी होत होती. तसेच, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये २४ तास पर्यटन वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री बाजारपेठा बंद असल्याने पर्यटकांना होणारी गैरसोय दूर होईल.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.