जयेश जगड, झी 24 तास अकोला: अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला 41चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे...काँग्रसने भाजपविरोधी पक्षांची मोट बांधत भाजपला शह देण्याचा रणनीती आखलीये...भाजपकडूनही पडद्यामागे हालचाली सुरूच आहेत...नेमकं अकोल्यात काय सुरू आहे पाहू या...
अकोला महापालिकेत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता संघर्षाची लढाई तीव्र झालीये...80 पैकी 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना बहुमतासाठी 3 जागा कमी पडत आहेत...त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाल्याने बहुमताचा आकडा पूर्ण होताना दिसत नाही...त्यामुळे दुसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांनी बहुमतासाठी जुळवाजुळ सुरू केलीय...त्यासाठी काँग्रेसने वंचितसह शिवसेना UBT, एमआयएमला सोबत घेत भाजपला शह देण्याची रणनीती आखलीये...या संदर्भात काँग्रेसने अकोल्यातील एका हॉटेलमध्ये भाजपविरोधी पक्षांची बैठक घेत त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी रणनीती आखलीये...
गुरुवारी अकोल्यात झालेल्या काँग्रेससह मित्रपक्षांच्या बैठकीत एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतंय...मात्र वंचित महापौरपदावर ठाम असल्याने चर्चा पुढे जाऊ शकली नसल्याची माहिती आहे...
दरम्यान काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं अशी भूमिका घेतलीय...तसेच सत्तेसाठी प्रकाश आंबेडकरांचं पूर्ण सहकार्य असल्याचंही काँग्रेसने म्हटलंय...
दरम्यान काँग्रेसने कितीही बैठका घेतल्या तरी महापौर भाजपचा बसणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय...
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More
LIVE|
ENG
152(19.4 ov)
|
VS |
SCO
138/5(17.1 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
IRE
(20 ov) 235/5
|
VS |
OMA
139(18 ov)
|
| Ireland beat Oman by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.