Elon Musk X Update: तुम्ही एक्स म्हणजेच आधीचे ट्विटर वापरताय? तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. याआधी तुमचे ब्लू टीक असेल तर ते पैसे भरल्यावरच सुरु राहिल्याचे तुमचे लक्षात आले असेल. किंवा नव्या ब्लू टिकसाठी तुमच्याकडे सब्स्क्रिप्शन मागण्यात आलं असेल. यामुळे अनेकांनी ब्लू टिकचा हट्ट सोडला. दरम्यान या धक्कातून तुम्ही सावरला नसाल तर तुमच्यासाठी आणखी एक धक्कादेणारी अपडेट आहे. आता तुमचा खिसा आणखी थोडा खाली करायचा प्लान एलन मस्क आणि त्यांच्या टिमने आणलाय. काय आहे हा प्लान? त्याचा तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम? याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलन मस्क जेव्हापासून एक्स (आधीचे ट्विटर) चे मालक बनलेयत तेव्हापासून त्यांचे त्यांचे पूर्ण लक्ष पैसे कमावण्यावर आहे. एक्सची मालकी घेतल्यावर त्यांनी सर्वात आधी ब्लू टिकसाठी युजर्सना पैसे मोजायला लावले. काही अटींसह ब्लू टिक आधी फ्री होती. पण एलन मस्क मालक बनल्यानंतर त्यांनी नियम आणि अटींमध्ये बदल केला. यानंतर ब्लू टिकसाठी यूजर्सना पैसे मोजावे लागले. 


किती मोजावे लागणार पैसे?


आता एलन मस्कने नव्या युजर्ससाठी मोठं प्लानिंग केलंय. एलन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स वर आता युजर्सना पोस्ट लाईक करण्यासाठीदेखील पैसे मोजावे लागणार आहेत. ही एक किरकोळ रक्कम असेल असे सांगण्यात येतंय. पण रक्कम नेमकी किती असेल, हे स्पष्ट करण्यात आलं नाहीय. 


 'बॉट रोखण्यासाठी एकमेव मार्ग'


पोस्ट, लाईक आणि रिप्लाय करण्यासाठी पैसे मोजावे लागले तर बॉट आणि फेक अकाऊंट्सवरुन येणाऱ्या पोस्ट कमी होतील, असे एलन मस्क यांना वाटते. सध्या कोणीही नवीन अकाऊंट बनवून कोणत्याही बाजुने पोस्ट करत चालला आहे. बॉट रोखण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. 


एक्सच्या नव्या पॉलिसीनुसार, एक्सवर कोणती पोस्ट करण्यासाठी, कोणाची पोस्ट लाईक करण्यासाठी, कोणाची पोस्ट बुकमार्क करण्यासाठी किंवा पोस्टवर रिप्लाय करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 


कोणाला फॉलो करण्यासाठीही पैसे?


एलन मस्क यांनी धडाडीचे निर्णय घेतल्यानंतर आता कोणते अकाऊंट फॉलो करायचे असतील तरी पैसे मोजावे लागतील का? असा प्रश्न विचारला जातोय. यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. तुम्हाला कोणत्या अकाऊंटला फॉलो करण्यासाठी सध्या तरी पैसे मोजावे लागणार नाहीत. ही सुविधा पुर्वीप्रमाणे मोफतच असणार आहे. एक्स प्लटफॉर्मवरील स्पॅम रोखण्यासाठी खूप काळापासून या पॉलिसीची टेस्टिंग सुरु होती.