मेरठची पुर्नरावृत्ती महाराष्ट्रात! पतीच्या हत्येनंतर मृतदेह जंगलात जाळला, संशय येऊ नये म्हणून त्याच्याच...

Yavatmal Crime News: प्रेमाविवाह केल्यानंतर मुख्याध्यापक असलेल्या पत्नीने शिक्षक पतीला विष देऊन ठार मारले. त्यानंतर तिच्याकडे शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाला जंगलात नेऊन पेटविले मात्र काही दिवसातच तिचे बिंग फुटले.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 21, 2025, 11:44 AM IST
मेरठची पुर्नरावृत्ती महाराष्ट्रात! पतीच्या हत्येनंतर मृतदेह जंगलात जाळला, संशय येऊ नये म्हणून त्याच्याच...
Yavatmal Crime News Woman school principal arrested for husband murder 3 students detained

Yavatmal Crime News: मुख्यध्यापक असलेल्या पत्नीने शिक्षक पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्यात लग्नाच्या काही वर्षातच खटके उडू लागले होते. त्याचाच परिणाम म्हणजे मुख्यध्यापिका पत्नीने पतीला विष देऊन ठार मारले. धक्कादायक म्हणजे तिच्याकडे शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने तिने पतीचा मृतदेह जंगलात नेऊन पेटवला. मात्र काही दिवसांतच तिचे बिंग फुटले व ति गजाआड झाली आहे. 

यवतमाळच्या चौसाळा जंगलात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. याबाबत पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत असताना शंतनू देशमूख हा युवक बेपत्ता असल्याचे समजले, पोलिसांनी तो ज्यांच्यासोबत दारू प्यायचा त्यांचीही चौकशी केली. शंतनूची पत्नी निधी हिची देखील विचारपूस केली. तिच्या बयानात विपर्यास वाटल्याने पोलिसांनी उलट तपासणी करताच 5 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनी पत्नीचे बिंग फुटले आहे. वर्षभरापूर्वी निधी व शंतनू यांचा प्रेमविवाह झाला होता, निधी सनराईज  शाळेत मुख्याध्यापक आहे, तर शंतनू त्याच शाळेत शिक्षक होता. लग्नानंतर दोघांमध्ये काही दिवसातच खटके उडायला लागले, त्यात शंतनूला दारूचे व्यसन जडले, त्यामुळे निधीने पतीचा काटा काढण्याचे ठरविले.

अतिशय शांत डोक्याने निधीने खुनाचा कट रचला. निधीने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांना भावनिकरीत्या जाळ्यात ओढले. मिशन यूपीएससी 2030 या नावाने तिने विद्यार्थ्यांचा व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला. रोज पहाटे ती मैदानावर विद्यार्थ्यांचा सराव घ्यायची. यातीलच तीन विद्यार्थ्यांची निवड करून निधीने त्यांचा खुनाच्या प्रकरणात वापर केला. अगोदर निधीने पतीला विष दिले त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर. तीन विद्यार्थ्यांना पहाटेच सरावासाठी बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी दुचाकीवरून मृतदेह चौसाळाच्या जंगलात नेऊन जाळला. दरम्यान शंतनूच्या सोशल मीडिया अकाउंटवरून निधी त्याच्या मित्रांशी व स्वतःच्या मोबाईलवर देखील चॅटींग करायची. याद्वारे शंतनू जिवंत असल्याचे ती भासवत होती म्हणून तो मिसिंग असल्याची देखील तक्रार तिने होऊ दिली नाही. मात्र शंतनू रोज जिथे दारू प्यायला जायचा तिथे तो येत नाही म्हणून पोलिसांना तो बेपत्ता असल्याचे समजले आणि या गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
 
मुख्याध्यापक असलेल्या निधीने स्वतःच्या कपाळावरील कुंकू निर्दयीपणे वागून पुसले, एवढेच नव्हे तर तिने शिक्षकी पेशाला काळीमा फासत तीन विद्यार्थ्यांच्या आयुष्याची देखील राखरांगोळी केली. पोलिसांनी निधी व तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.