यवतमाळ : यवतमाळमध्ये डिसेंबर महिन्यातच जाणवणाऱ्या भीषण पाणीटंचाईने एकाचा बळी घेतलाय.


डिसेंबरमध्येच भीषण पाणीटंचाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विहीरीतून पाणी काढत असताना विलास राठोड यांचा विहीरीत पडून मृत्यू झालाय. पांढरी गावात ही दुर्घटना घडली. या गावासह जिल्ह्यात डिसेंबरमध्येच भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.


उपाययोजना न केल्यामुळे पाणीबळी गेल्याचा आरोप


प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यामुळे पाणीबळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. संतप्त ग्रामस्थांनी यवतमाळ अकोला मार्गावर ३ तासांपासून चक्काजाम आंदोलन केलं.


निळोणा धरण कोरडे पडले


यावर्षी यवतमाळ जिल्हा पाणीटंचाईने पोळल्या जात आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण कोरडे पडले असून चापडोह धरणातही १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.


जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई


वणीमधील निर्गुडा नदी आटल्याने तर उमरखेडमध्ये पैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाण्यासाठी नागरिकांच्या दाही दिशा होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.



यवतमाळमध्ये भीषण पाणीटंचाईचा बळी