)
Mahesh Kothare On BJP : दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठेरे सध्या चांगलेच चर्चेत आहेत ते त्यांनी केलेल्या राजकीय फटकेबाजीमुळे. महेश कोठेरे यांनी नुकतंच राजकीय फटकेबाजी केलीये. मागाठाणे इथं भाजप आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे यांनी भाजपचं तोंडभरून कौतुक केलंय. भाजपं म्हणजे आपलं घर आहे कारण मी स्वत: भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचा भक्त असल्याचं महेश कोठारेंनी सांगितंलय.हे कौतुक करत असतानाच त्यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे महेश कोठारेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झालीये. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या रमेश पाटील यांनी महेश कोठारे यांना फोन केले. तुम्हाला EDची नोटीस तर आली नाही ना? असा सवाल महेश कोठारे यांना वितारला. यावर त्यांनी असे उत्तर दिल की याची ऑडिओ क्लीप चांगलीच व्हायरल झाली आहे.
मोदींचा भक्त आहे म्हटल्यावर तुम्हाला ईडीची नोटीस तर आली नाही ना, असा सवाल रमेश पाटील यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारेंना केलाय. या दोघांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रमेश पाटील यांनी महेश कोठारे यांनी फोन करत ईडी नोटीसाबाबत विचारलं आहे. मी भाजप भक्त आहे आणि मी मोदी भक्त आहे. ठामपणे सांगतो असं महेश कोठारे यांनी रमेश पाटील यांना उत्तर दिले.
महेश कोठारेंनी भाजपचं कौतुक केल्यानंतर विरोधकांच्या टीकात्मक प्रतिक्रिया येणं साहजिकच. या वादानंतर कोठारेंनी आपण आपल्या मतांवर ठाम असल्याचं सांगितलंय. झी 24 ताससोबत बोलताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखल देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीये. मात्र महेश कोठारेंच्या या वक्तव्यावरून कोठारे राजकारणात एण्ट्री करणार का अशीही चर्चा रंगलीये.
आगामी निवडणुकांची किनार यंदाच्या दिवाळीला पाहायला मिळत आहेत. प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारे यांनी आपण भाजप आणि मोदींचे भक्त असल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलीये. आता या सगळ्यावर कलाकार मंडळीही आपली मतं मांडू लागलीयेत.
दिग्दर्शक आणि अभिनेते दरम्यान महेश कोठारेंच्या या वक्तव्यावरून शिवसेना UBT पक्षाचे खासदार संजय राऊतांनी कोठारेंवर निशाणा साधलाय.. भाजपचा महापौर होण्याचा दावा करणारे कोठारे नक्की मराठीच आहेत ना ? असा सवाल राऊतांनी विचारलाय. तर कोठारेंनी भाजपची बाजू घेतल्याने राऊतांना मिरच्या झोंबल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय.
FAQ
1 महेश कोठारे यांनी भाजपबाबत काय वक्तव्य केले?
मागाठाणे येथे भाजप आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे यांनी भाजपचे जोरदार कौतुक केले. त्यांनी सांगितले की, "भाजप म्हणजे आपले घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे." तसेच, मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
2 हे वक्तव्य कधी आणि कुठे करण्यात आले?
हे वक्तव्य आगामी दिवाळीच्या काळात, प्रवीण दरेकर यांच्या आयोजनात मागाठाणे येथील भाजपच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात करण्यात आले. यामुळे निवडणुकांच्या काळात राजकीय चर्चा रंगली.
3 रमेश पाटील यांनी महेश कोठारे यांना काय विचारले?
छत्रपती संभाजीनगरचे रमेश पाटील यांनी महेश कोठारे यांना फोन करून, "मोदींचा भक्त आहे म्हटल्यावर तुम्हाला ईडीची नोटीस तर आली नाही ना?" असा सवाल केला. ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.