)
Rohan Humbe: दुष्काळी भाग असलेल्या धाराशिव जिल्ह्यातही यंदा चक्क अतिवृष्टीचा पाऊस झाला अनेक गावोगावची शेतं उपळून वाहुन गेली. ईट गावात राहणारे हुंबे कुटुंब यांची संपूर्ण शेती पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आता निर्माण झाला आहे.त्यामुळे पुण्यात शिकणाऱ्या रोहन रवींद्र हुंबे हा मानसिक तणावात आहे. घरची परिस्थिती पाहून शिक्षणासाठी कसे पैसे मागणे हा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला.
पेट्रोल केमिस्ट्री क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून धाराशिव मधील ईट गावच रोहन हुंबे हा पुण्यात मोठ्या उमेदीने आलाय.मॉर्डन काँलेजमध्ये अँडमिशनही घेऊन तो थर्ड इयर बीएससी केमिस्ट्री चे शिक्षण घेतोय. हॉस्टेलमध्ये राहून अभ्यासही करतोय पण त्याला चिंता सतावतेय आता महिना किंवा इथून पुढे कस भागवायचे ते.कारण इट या त्याच्या गावी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन आणि मक्याचे पीक पूर्णपणे नष्ट होऊन गेलंय.
संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असलेली शेतीच आता राहिली नाही त्यामुळे पुढे जगायचं कसं या चिंतेने दोन दिवसांपासून रोहन मानसिक तणावात आहे. शेतीच्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशाने रोहनचा पुण्यातील शैक्षणिक खर्च भागत होता.रोहनला महिन्याला मेस आणि हॉस्टेलचे असे पाच हजार खर्च आहे तर कॉलेजचा खर्च हा जवळपास वर्षाला 60 हजार आहे.आता हा खर्च भागवायचा कसा हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे.
हुंबे या अल्पभूधारक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 70 हजार पण अतिवृष्टी झाल्याने तेही मिळणार नाहीये.म्हणूनच रोहन हुंबे या तरुणाला शिक्षणासाठी मदत करा, असं तो झी 24 तासच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे
या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही पुढील बँक अकाउंटवर थेट मदत करू शकता.
नाव - रोहन रविंद्र हुंबे
कॉलेज - मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स,सायन्स ॲन्ड कॉमर्स शिवाजीनगर पुणे
कोर्स - B.Sc
कॉलेज फी -10,500
रूम रेंट - 1,500 प्रति महिना
Exam फी - 1,300
Account No.- 43266711740
IFSC- SBIN0008784
Branch- Aundh Pune
उत्तर: रोहन रवींद्र हुंबे हे धाराशिव जिल्ह्यातील ईट गावातील शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. ते पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये थर्ड इयर बीएससी केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत. पेट्रोल केमिस्ट्री क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न बाळगून ते हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करत आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे कुटुंबाची शेती नष्ट झाल्याने आर्थिक संकट आले असून, रोहन दोन दिवसांपासून मानसिक तणावात आहेत.
उत्तर: धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी भाग असतानाही यंदा अतिवृष्टी झाली, ज्यामुळे ईट गावातील हुंबे कुटुंबाची संपूर्ण शेती (सोयाबीन आणि मका) पाण्यात वाहून गेली. हे कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने वार्षिक ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे, ज्यामधून रोहनचे शिक्षण चालत असे. आता कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोलमढले असून, जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
उत्तर: रोहनला महिन्याला मेस आणि हॉस्टेलसाठी ५,००० रुपये आणि कॉलेजसाठी वर्षाला ६०,००० रुपये खर्च येतो. अतिवृष्टीमुळे हे भागवणे कठीण झाले आहे. झी २४ तासाच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून, गरजू विद्यार्थ्यांना थेट बँक खात्यात मदत करून आधार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.