)
Fakt Ladh Mhana : परभणी जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आकांक्षा आणि पांडुरंग घुगे बहीण भाऊ. शिक्षणासाठी दोघे परभणीतून पुण्यात आले. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचं शेत पाण्याखाली गेलंय. शिक्षण कसं घ्यायचं हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी झी 24 तासनं त्यांच्यासाठी फक्त लढ म्हणा हा विशेष उपक्रम सुरु केलाय. पाहुयात बहिण भावाची शिक्षणासाठीच्या संघर्षाची कहाणी...
साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारी ही घुगे भावंड हल्ली चिंतेत असतात. कारण गावाकडे परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ पडल्याने हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक सडून गेलंय. जिंतूर तालुक्यातलं अंबरवाडी हे त्यांचं गाव. शिक्षणासाठी घरातून पैसेच येणार नाहीत. त्यामुळे पुढील शिक्षण होणार की नाही याची काळजी दोघांना लागलीय. पांडुरंग बीएससी अग्री करून स्पर्धा परिक्षा देतोय तर आकांक्षा रसायनशास्र विभागात MSc करतेय.
शेतक-याच्या मुलांना शिक्षणासाठी तुमच्या मदतीची गरज आहे...तुम्ही दोघांच्या बँक खात्यात थेट मदत करु शकता...
आकांक्षा विजय घुगे
बँक खातं क्रमांक- 33349647196
IFSC CODE - SBIN0003423
बँक- स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा- जिंतूर
GPAY- 9096773834

---------
पांडुरंग विजय घुगे
बँक खातं क्रमांक- 80058381866
IFSC CODE- MAHG0004205
बँक- महाराष्ट्र ग्रामीण बँक
शाखा- जिंतूर
GPAY- 8459836714

शेतक-याच्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना तुम्ही आर्थिक मदत करा येवढचं झी 24 तासच सर्वांना आवाहन...