भाजपाने अजित पवारांना करुन दिली सिंचन घोटाळ्याची आठवण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'काल राज ठाकरे...'

Zee 24 Tass Exclusive To The Point Supriya Sule: पुणे आणि पिंपरी-चिंडवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपासोबत लढत नसून विरोधात लढत आहे. राज्यातील सरकारमध्ये युतीत असलेले हे पक्ष स्थानिक निवडणुकीत विरोधात आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 9, 2026, 03:27 PM IST
भाजपाने अजित पवारांना करुन दिली सिंचन घोटाळ्याची आठवण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'काल राज ठाकरे...'
विशेष मुलाखतीत केलं भाष्य

Zee 24 Tass Exclusive To The Point Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट वीथ कमलेश सुतार' (To The Point With Kamlesh Sutar) या विशेष कार्यक्रमात सहभागी झाल्या. या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळेंनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलं. अगदी पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणापासून ते पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यापर्यंत अनेक विषयांवर सुप्रिया सुळे मनमोकळेपणे बोलल्या. याच मुलाखतीदरम्यान पिंपरी-चिंडवडमध्ये तसेच पुण्यात संयुक्त लढणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून राज्यात सत्तेत सोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांना सिंचन घोटाळ्याची आठवण करुन दिली जात असल्याच्या मुद्द्यावरही सुप्रिया यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही खोचक शब्दात निशाणा साधला.

Add Zee News as a Preferred Source

विलासराव देशमुखांच्या मुलांचं कौतुक

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होईल अशी मागणी कराल का? असा सवाल सुप्रिया यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, "हा देश सर्वांसाठी पारदर्शकपणे चालला पाहिजे. पार्थ असो किंवा विजय आणि रेवतीबद्दल हेच म्हणेल. पण हा देश पारदर्शकपणे चालतो का असा प्रश्न पडतो. याचीच चिंता वाटते. पार्थ मला मुलासारखा आहे. ज्या चौकटीत तुम्हाला नियम आणि तोच आम्हाला आहे. भाजपाने एक नवा ट्रेण्ड त्यांच्या लोकांसाठी काढला आहे त्याला मी वॉशिंग मशिन म्हणते. मोदीजी पहिल्यांदा आले तेव्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करावा असं म्हटलं होतं. परवा नांदेडलाच बघा ना. लातूर आणि नांदेडला मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे लोक गेलं. लातूरच्या टीकेवर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. तिन्ही देशमुख बंधू अतिशय सुसंस्कृतपणे त्यांचा सन्मान ठेवून वागले," असं उत्तर दिलं. 

अशोक चव्हाणांवर निशाणा

पुढे बोलताना अशोक चव्हाणांवर सुप्रिया यांनी निशाणा साधला. "मी जड अंतकरणाने म्हणते. त्या घरात दोन पिढ्यांमध्ये काँग्रेसमुळे मुख्यमंत्री झालेले आहेत. तिथे जाऊन मुख्यमंत्री म्हणतात की 70 वर्षात नांदेडला काहीच झालं नाही. त्याला कोणी डिफेंडही केलं नाही. तुम्ही स्वत:ला नाही वडिलांना तरी करा," असं सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत म्हटलं. "त्यांचे (अशोक चव्हाणांचे) वडील होम मिनिस्ट होऊन गेले देशाचे. मोठी पदं भूषवली आहेत. त्यांनी शून्यातून सारं उभं केलं. हे अस्वस्थ करणार आहे. भाजपाला संधी होती नवं नेतृत्व तयार करायची. तुम्ही काँग्रेसला नाकारून सत्तेत आला. आज तीच 60 टक्के काँग्रेस तुमच्यामध्ये आहे. मग ही धोरण, नियम कायदे जे विरोधी आहेत त्यांच्यावर लागतात. भाजपाने पाहिजे ते करावं आणि देश चालवावा. महाराष्ट्रातला गोंधळ लाँग टर्मसाठी हे हानीकारक असल्याची मला चिंता वाटते," असंही सुप्रिया यांनी म्हटलं. 

सिंचन घोटाळ्याची आठवण

"पुण्याबरोबरच पिंपरीमध्ये तुमच्यासोबत आहेत. भाजपाने आठवण करुन दिली की सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाहीये. अजित पवारांनी महाराष्ट्र लुटला असा आरोप स्थानिक नेते लांडगे यांनी केला आहे. ही आठवण करुन दिली जात आहे. तुम्हालाही डिफेंड करावं लागले," असं कमलेश सुतार यांनी सुप्रिया सुळेंना विचारलं. त्यावर त्यांनी, "हे मी फार गांभीर्याने घेत नाही. यात भाजपाचा दुटप्पीपणा दिसतो. काल राज ठाकरे हेच बोलले. सत्तेसाठी तुम्ही कोणतीही तडजोड करायला तयार आहात. मग मान्य करा तुम्ही चुकीचे आरोप केले. आता राँग बॉक्समध्ये भाजपा आहे. आम्ही कोणीच नाही. भाजपा पार्टी विथ डिफ्रन्स आणि लार्जेस्ट पार्टी इन वर्ल्ड सांगतात याचा आता त्यांनीच विचार केला पाहिजे. सत्तेत बसण्यासाठी तुम्ही कॉम्प्रमाइज करता ते कुठे तरी थांबलं पाहिजे," अशी अपेक्षा व्यक्त केली.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More