)
Beed Crime News : बीडमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आहे. 4 महिला गंभीर जखमी झाले आहेत. 10 ते 15 जणांच्या टोळक्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. खोक्या सध्या जेलमध्ये आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान परिसरात घडली आहे.. या जीवघेणा हल्ल्यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 10 ते 15 जणांच्या टोळक्याने पारधी वस्तीवर हल्ला केला. हातात दांडके कोयते आणि कु-हाडीने मारहाण करण्यात आली. अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता म्हणून टोळक्यांनी जबर मारहाण केल्याची माहिती आहे.
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी धर्मांतरासाठी प्रयत्न केले असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. यानंतर वकील राहुल आघाव यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत याला दूजोरा दिला होता. यानंतर काल वकील राहुल आघाव, कैदी कल्याण भावले आणि जळगाव येथे पेट्रस गायकवाड यांच्यावर ज्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप झाला त्या स्व.रवींद्र जगताप यांच्या पत्नीने बीडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेतून जामीनावर सुटलेल्या कल्याण भावले या कैद्याने कारागृहामध्ये पेट्रस गायकवाड यांनी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करावं यासाठी आम्हाला मारहाण केली, कधी जेवण देत नव्हते तर कधी पैशाचे आमिष दाखवायचे असा आरोप केला आहे. तर दुसऱ्या बाजूला माझे पती रवींद्र जगताप यांची हत्या पेट्रस गायकवाड आणि इतर चार कारागृहातील पोलिसांनी धर्मांतर करावं यासाठीच केली.
बीडमध्ये पुन्हा तसाच प्रकार सुरू आहे यामुळे मी बीडमध्ये येऊन ही पत्रकार परिषद घेत आहे. मला लाखो रुपयांचे आमीष दिले जात आहे आणि केस मागे घे असा दबाव आणला जात आहे असाही आरोप मीना रवींद्र जगताप यांनी केला. तर कैद्याचे वकील राहुल आघाव यांनी संबंधित कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार केली आहे. पुढील आठ दिवसात कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचीही माहिती राहुल आघाव यांनी दिली आहे.