IIT Mumbai Placement Job : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईमध्ये (आयआयटी मुंबई) 1 डिसेंबरपासून प्लेसमेंट मुलाखतींचे हिवाळी सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी 1.48 कोटी रुपये वेतन दा व्हिन्सी या कंपनीने देऊ केले आहे. पहिल्या दिवशीचा हा सर्वाधिक वेतनाचा प्रस्ताव ठरला. यंदा कॅम्पस मुलाखत मेळाव्यात पहिल्या दिवशी 42 कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर 98 विद्यार्थ्यांना नोकरीचे प्रस्ताव मिळाले.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी मुंबईच्या कॅम्पस मुलाखतींच्या पहिल्याच दिवशी जवळपास 98 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या. तसेच आणखी 70 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी अंतिम निवड झाली. मात्र पुढील काही दिवसांत अधिक चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असल्याने या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव स्वीकारलेले नाहीत.
पहिल्या दिवशी फ्लिपकार्ट, जे. पी. मॉर्गन, बार्कलेज आणि क्वालकॉम यासारख्या मोठ्या कंपन्यांनी मुलाखती व निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. त्याचबरोबर जीई, एअरबस आणि बार्कलेज या कंपन्यांनी नियोजित मुलाखतींबरोबरच वॉक-इन प्रक्रिया देखील घेतली. प्लेसमेंटच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा जवळपास ३५ हून अधिक कंपन्या प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या. दुसऱ्या दिवशी एलॉन मस्कच्या मालकीची जागतिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला दुसऱ्या दिवशी सर्वाधिक नोकरीची संधी देणाऱ्या कंपनीपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या हंगामाच्या पहिल्या दिवशी जाहीर झालेल्या नोकऱ्यांसदर्भातील आयआयटी मुंबईने अधिकृतरित्या कोणतीही माहिती जाहीर केली नाही.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.