आज राज्यात कोरोनाचे २९३३ रुग्ण वाढले, तर १२३ जणांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
मुंबई : आज राज्यात कोरोनाचे २९३३ रुग्ण वाढले असून १२३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३३,६८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ४१३९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईमध्ये ४४९३१, ठाण्यात ११४२०, पालघरमध्ये १२३४, रायगडमध्ये १२९३, नाशिकमध्ये १२९७, अहमदनगरमध्ये १७०, धुळ्यात १८७, जळगावमध्ये ८५२, पुणे ८८२५, सोलापूर ११२५, सातारा ५८४, कोल्हापूर ६१२, सांगली १२७, रत्नागिरी ३२९, औरंगाबाद १७१४, अकोला ६७९, अमरावती २७२ , यवतमाळ १५५, नागपूर ६६२ कोरोना बाधित रुगण आढळले आहेत.
राज्यातील बरे होण्याचं प्रमाण ( Recovery Rate ) ४३.२९ टक्के आहे. तर मृत्यू दर ३.४८ टक्के आहे. राज्यात सध्या ५,६०,३०३ लोक होम क्वारंटाईन आहेत.
आज मृत्यू झालेल्या १२३ रुग्णांपैकी, ठाण्यातील ६८, नाशिकमधील २५, पुण्यातील १६, औरंगाबादमधील ८, लातूरमधील ३ तर अकोल्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.