कोविड रूग्णालयात आग, एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
मुलुंडच्या अॅपेक्स रूग्णालयाच्या आगीत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई : मुलुंडच्या अॅपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर जनरेटलही जळाल्यामुळे रुग्णालय अंधारात गेले होते. अथक परिश्रमानंतर रुग्णालायतील ४० कोरोना रुग्णांना बाहेर काढण्यात आले. मात्र यापैकी एकाचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली आहे. अॅपेक्स हॉस्पिटमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताचा खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीनं अन्य रुग्णांना वेळीच सुरक्षीत स्थळी हालवण्यात आलं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात आले आहे.