शिवसेनाभवनपर्यंत पोहोचला कोरोना; घेतला मोठा निर्णय

सुरक्षेच्या कारणास्तव...

Updated: Jun 23, 2020, 09:34 AM IST
शिवसेनाभवनपर्यंत पोहोचला कोरोना; घेतला मोठा निर्णय  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या आणि देशातही अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या coronavirus कोरोना विषाणूची दहशत आता थेट मुंबईतील शिवसेना भवन या वास्तूपर्यंत येऊन पोहोचली आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सावधगिरीचं पाऊल म्हणून पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे. 

शिवसेना भवनात नेहमी ये-जा असणाऱ्या खासदार अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळत आहे. ज्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवन जवळपास आठवडाभर बंद राहणार आहे. 

 

सोमवारी या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येतात संपूर्ण सेनाभवन सॅनिटाईझ केलं असून, येथे पुढील आठवडाभरासाठी कुणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेतला. 

'मुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल'

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोवा व्हायरसशी लढणअयासाठी मुंबई आणि इतरही ठिकाणच्या स्थानिक प्रशासनांनी कंबर कसली आहे. बहुविध प्रयत्नांनी या व्हायरशी दोन हात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. परिणामी  मुंबई उपनगरांतील अनेक वॉर्डांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी जुलैच्या मध्यापर्यंत शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात येईल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे.