Mumbai Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने एक नवा प्रकल्प आणला आहे. मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तिसरा पर्याय आणला आहे. तिसरी वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी एमएमआरडीएने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
एमएमआरडीएकडून इंटिग्रेडेट भुयारी रस्ता रोड नेटवर्कसाठी सविस्तर प्रकल्प अहवालासाठी डीपीआर प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहतुकीच्या मागणीनुसार आणि भविष्यातील वाढीच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबवला जाणार आहे. मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) आणि एस. व्ही. रोड वरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर भूमिगत मार्गामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल, अवजड वाहने भुयारी रस्तेमार्गे वळवली जातील आणि शहरात वाहतूक कोंडी कमी होईल.
सुमारे ७० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. या माध्यमातून रस्ते आणि मेट्रो यांना पूरक असे एकत्रित वाहतूक नेटवर्क तयार होईल, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. मुंबईतील दाटीचे बांधकाम व मर्यादित जागा लक्षात घेता, भूमिगत मार्ग ही वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी सर्वाधिक शाश्वत आणि व्यवहार्य पर्याय ठरणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी वाहतुकीच्या आवश्यकतांनुसार व भविष्यातील मागणी लक्षात घेऊनच टप्प्याटप्प्याने केली जाईल.
• पहिला टप्पा: वरळी सी लिंक – बीकेसी – विमानतळ लूप (सुमारे 16 किमी)
मुंबई कोस्टल रोडला बीकेसी आणि विमानतळाशी जोडणारा मार्ग, तसेच मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरशी एकत्रित होणारा भाग. या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग व एस.व्ही. रोडवरील कोंडी कमी करण्यावर भर असेल.
• दुसरा टप्पा: पूर्व–पश्चिम जोडणी (सुमारे 10 किमी)
पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडून क्रॉस-शहर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करणे.
•तिसरा टप्पा: उत्तर–दक्षिण जोडणी (सुमारे 44 किमी)
संपूर्ण मुंबईभर अखंड भूमिगत मार्ग तयार करून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी नवी जोडणी उभारणे.
हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणलेला इंटिग्रेडेट भुयारी रस्ता रोड नेटवर्क तयार करण्याचा आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तिसरा वाहतूक पर्याय उपलब्ध होईल.
पहिला टप्पा मुंबई कोस्टल रोडला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) यांना जोडेल.
सध्या MMRDA कडून इंटिग्रेडेट भुयारी रस्ता रोड नेटवर्कसाठी सविस्तर प्रकल्प अहवालाची (DPR) प्रक्रिया सुरू झाली आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.