Crime News: मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकलमध्ये (Mumbai Local) एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. 40 वर्षीय आरोपीने 20 वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या ट्रेनमध्येच बलात्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मस्जिद (Masjid) स्थानकांदरम्यान, सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी हा सगळा प्रकार घडला. यादरम्यान आरोपीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. या व्हिडीओत आरोपी सीएसएमटी स्थानकावर काही महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.
सीसीटीव्हीत आरोपी नवाजू करीम शेख स्टेशनवर फिरताना दिसत आहे. यावेळी तो तेथील महिलांना जाणुनबुजून छेडत होता हे कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. बलात्कार केला त्याच दिवशी सकाळी त्याने स्थानकावर एकूण 5 महिलांची छेड काढली होती. इतकंच नाही तर त्याने गर्दी असतानाही एका महिलेला सरळसरळ धक्का दिल्याचं दिसत आहे.
बलात्काराची घटना घडली त्यादिवशी सकाळी नवाजू शेख स्थानकावर महिलांना टार्गेट करत होता. त्याने एकूण 5 महिलांची छेड काढत त्यांना त्रास दिला. पण त्यापैकी एकाही महिलेने पोलिसांकडे तक्रार केली नाही. व्हिडीओ आरोपी चालताना अचानक एका महिलेच्या समोर जाऊन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर तो आपण ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दर्शवतो. यावेळी महिलेच्या मागे चालणारी व्यक्तीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. पण कोणीही त्याला रोखत नाही.
इतर दोन महिलांनाही आरोपीने त्रास दिला होता. पण त्यांनी त्याला अडवलं नाही आणि काही न करता चालत निघून गेल्या.
Mumbai Man Who Sexually Assaulted Student On Local Train Misbehaved With 5 Other Women At CSMT Station; Visuals Surface.
So many CCTV's at station premises...but is there any real time watch?https://t.co/TzYRgjfKmkpic.twitter.com/oGSrJFH2gc https://t.co/mHYX7Ntle1
— मुंबई (@mumbaimatterz) June 16, 2023
बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मस्जिद स्थानकांदरम्यान एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तरुणी परीक्षा देण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती. यावेळी आरोपी ट्रेनमध्ये चढला आणि लैंगिक अत्याचार केले. तरुणीने आरडाओरड केली असता आरोपीने पळ काढला होता.
यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरपीएफ आणि मुंबई पोलिसांनी पथकं तयार करत आरोपींचा शोध सुरु केला होता. मस्जिद स्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्याच रात्री बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली.